अशोक खरातचा माज उतरेना, SIT ची खळबळजनक माहिती, कोर्टात काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं.
लक्ष्मण घाटोळ प्रतिनिधी नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, एसआयटीनं कोर्टात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अशोक खरात पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं आहे. यावेळी सरकारी वकिलांनी देखील अशोक खरातबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी गंभीर युक्तीवाद मांडला आहे. अशोक खरात लैंगिक छळ प्रकरणात SIT च्या तपासात सहकार्य करत नाहीये. त्यामुळे अनेक अडथळे येत आहेत. अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याने तपासाला विलंब होत असल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं आहे. खरातच्या या भूमिकेमुळे आता तपासाची दिशा आणि गती दोन्हीबाबत विविध प्रश्न निर्माण होत आहेत.
advertisement
सरकारी वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
आरोपी अशोक खरात हा अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्या नावावर अनेक जंगम मालमत्ता आहेत, त्याचा तपास करायचा आहे. तो पीडितांना जे पाणी प्यायला द्यायचा. त्यात तो काय वापरायचा हे तो सांगत नाही. संपूर्ण देशाचं या प्रकरणाकडे लक्ष आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. अनेक पीडित महिला समोर येत आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे.
advertisement
याबाबत विविध डिजीटल माहिती घ्यायची आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करायचा आहे. हा संवेदनशील गुन्हा आहे. त्याने अनेक महिलांना फसवलं आहे. अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आरोपीला आणखी 3 दिवसांची पोलीस कस्टडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
आरोपी खरातच्या वकिलांचा युक्तीवाद काय होता?
आरोपी अशोक खरातचे वकील सचिन भाटे यांनी कोर्टात युक्तीवाद केला की, पहिल्या रिमांड वेळी जी कारणं सांगितली होती. तीच कारणं आता सांगितली जात आहेत. मागच्या वेळी सांगितल्यानुसार, तपास अधिकाऱ्यांनी व्हिडीओ जप्त केले नाहीत. त्यांनी पेनड्राईव्ह अद्याप जप्त का केला नाही ? कडवट द्रव्य पाजलं जात होतं, हे सांगितलं होतं, आत्ताही तेच सांगत आहेत. जंगम मालमत्ता बाबत मागच्या वेळीही हेच सांगितलं होतं. त्यानुसार कोर्टाने पोलीस कस्टडी दिली होती
advertisement
पैसे, लॅपटॉप, मोबाईल, काळ्या रंगाची पिस्टल, जिवंत काडतुसे, आणि वापरलेले क्लोन कॉपी मिळालेली नाही. जप्त झालेली नाही तर पोलीस कस्टडी कशी मागत आहेत. तपासासाठी आता आरोपी आणि कोर्टाची गरज नाही. वाढीव पोलीस कास्टडीची गरज नाही, त्यामुळे त्यांची मागणी रद्द करावी, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 12:52 PM IST








