advertisement

Mumbai Local : बाप रे! लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला तरुणांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं; दरवाजाजवळ ओढत नेत...

Last Updated:

Mumbai Local Shocking News : मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. नक्की काय घडले आणि कोणासोबत घडले हे जाणून घेण्यासाठी एकदा बातमी पाहा.

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशाला मारहाण
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशाला मारहाण
मुंबई : मुंबई लोकलमधील एका महिला प्रवाशावर दगडफेकीची घटना ताजी असतानाच आता दिव्यांग प्रवाशाला काही जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सध्या या दिव्यांग तरुणाच्या हाणामाराची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपातापाची लाट उसळली आहे आणि नेटकऱ्यांकडून दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
दगडफेकीच्या दहशतीनंतर आता मारहाणीचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार,ही संपूर्ण घटना कर्जत फास्ट लोकलमध्ये घडली आहे. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 2.45 वाजता सुटली होती. दरम्यान भायखळा स्थानकात ट्रेन आल्यावर लोकलच्या दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यांत काही सक्षम पाच ते सह जण आले आणि त्यांनी पोलिओग्रस्त असलेल्या व्यक्तीला मारहाण केली.
व्हिडिओत नक्की काय घडते?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसत आहे की, दिव्यांग डब्यात चढलेल्या तरुणांच्या टोळीने दिव्यांग व्यक्तीला खाली पाडले आणि त्याला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे त्याला धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ ओढते नेले आणि लोकल ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दादर ते कुर्ला स्थानकादरम्यान घडली.https://www.instagram.com/reels/DWaePg9gUwN/
advertisement
घटनेनंतर आरोपी फरार
दिव्यांग प्रवासाला मारहाण करणारे आरोपी कुर्ला स्थानक आल्यानंतर पसार झाले तर ज्याला मारहाण केली तो प्रवासी पुढे घाटकोप स्थानकात उतरला. मात्र या घटनेची कुठेही आणि कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही.सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ' hahaanpana.i'या अकाउंटवरही शेअर करण्यात आलेला असून अनेक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''दिव्यांग काद्यातुन दिव्यांगला मारहाण करणारे जे कोणी असतील त्याच्यावर गुन्हा दाखल होवु शकतो'' तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं,''दर घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी'' असा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : बाप रे! लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला तरुणांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं; दरवाजाजवळ ओढत नेत...
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement