advertisement

पुण्यात 25 हून अधिक गुन्हे करून आरामात फिरत होता; पुणे पोलिसांनी पकडताच झाला असा खुलासा की सगळेच चक्रावले

Last Updated:

आरोपी अर्जुनसिंग हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पुणे आणि परिसरात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत

आरोपी अर्जुनसिंग हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे (प्रतिकात्मक फोटो)
आरोपी अर्जुनसिंग हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: रामनवमीच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका सराईत घरफोड्याला फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ४८, रा. मांजरी, ता. हवेली) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मार्केटयार्ड आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
असा लागला छडा
पुणे शहरात सण-उत्सवाच्या काळात घरफोडीच्या घटना वाढू नयेत, यासाठी गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक गस्तीवर होते. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी हा मार्केटयार्ड परिसरातील बैल बाजार भागातून जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि दुधानीला ताब्यात घेतले.
advertisement
तपासात धक्कादायक खुलासे
पोलिसी खाक्या दाखवताच दुधानीने मार्केटयार्ड आणि बिबवेवाडी परिसरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, आरोपी अर्जुनसिंग हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पुणे आणि परिसरात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
advertisement
ही यशस्वी कारवाई अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, संतोष टकले आणि पथकाने केली. या अटकेमुळे शहरातील इतरही काही घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 25 हून अधिक गुन्हे करून आरामात फिरत होता; पुणे पोलिसांनी पकडताच झाला असा खुलासा की सगळेच चक्रावले
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement