तिहार जेलच्या अधिकार्यांसमोर समर्पण (आत्मसर्पण) होण्यापूर्वी राजपालने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज एक्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजपाल त्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर भावनिक होऊन म्हणाला की, "सर, माझ्याकडे पैसे नाही आणि दुसरा काही उपाय सुद्धा माझ्याजवळ नाही, तुम्हीच सांगा मग काय करू? सर मी इथे एकटाच आहे, इथे जवळपास माझा कोणता मित्र सुद्धा नाही. या अडचणीवर मला एकट्यालाच मात करावी लागणार आहे." अभिनेत्याला बऱ्याचदा पोलिसांकडून आणि कोर्टाकडून पैसे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पण एकदाही अभिनेत्याने पैसे भरले नाही. एकदा चेक दिला, पण बँक खात्यात पैसे नसल्यामुळे चेक बाऊन्स झाला.
advertisement
चेक बाऊन्स प्रकरणामुळे सुद्धा अभिनेता कमालीचा चर्चेत आला होता. हे प्रकरण 2010 चे आहे. राजपाल यादवने त्याने दिग्दर्शित केलेल्या "अता पता लापता" या चित्रपटाच्या फायनान्ससाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि अभिनेता डबघाईला गेला. शिवाय, बँकेत पैसे नसल्यामुळे त्याने काढलेला चेक बाउन्स झाला. एप्रिल 2018 मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 अंतर्गत दोषी ठरवले आणि त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राजपाल यादवने या निर्णयाला आव्हान देत कोर्टात केस दाखल करत दिलासा घेतला.
राजपाल यादव दिलासा मिळाला असला तरी, त्याची थकबाकी सुमारे 19 कोटींपर्यंत वाढल्याचे वृत्त आता समोर आले आहे. पण काही काळानंतर, अभिनेत्याने थकबाकी असलेल्या रकमेचा काही भाग भरला. वारंवार उशिर आणि दिलेली डेडलाईन न पाळल्यामुळे न्यायालयाने त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजपाल यादवने दिलासा मागितल्यानंतर, न्यायालय असे म्हटले की, एखाद्या व्यक्तीची सार्वजनिक प्रोफाइल काहीही असो, त्याला वारंवार दिलासा देता येत नाही. त्यानंतर न्यायालयाने अभिनेत्याला अधिक विलंब न करता सरेंडर (आत्मसमर्पण) होण्याचे निर्देश दिले आणि राजपाल यादवने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत तिहार तुरुंगामध्ये सरेंडर केले.
