TRENDING:

रिलस्टार निर्मला नवले जिंकल्या असत्या, फक्त कमी पडली इतकी मतं, कारण समोर Video

Last Updated:

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या माजी सरपंच निर्मला नवले यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज मंडळींना पराभवाचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या माजी सरपंच निर्मला नवले यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या कारेगाव–कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी अटीतटीच्या लढतीत 329 मतांनी निर्मला नवले यांचा पराभव केला. माजी सरपंच निर्मला नवले यांनी या पराभवानंतर लोकल 18 ला प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement

पुणे जिल्हा परिषदेच्या 73 आणि 13 पंचायत समितीच्या 146 गणांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत कारेगाव गणातून माजी सरपंच निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून मनीषा पाचंगे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या अटीतटीच्या लढतीत मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा 329 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या पराभवामुळे निर्मला नवले आणि त्यांच्या समर्थकांमध्येही निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

advertisement

पुण्याचा गणेशची कमाल, काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला 16 दिवसांत पूर्ण, रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

निर्मला नवले काय म्हणाल्या?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रिलस्टार निर्मला नवले जिंकल्या असत्या, फक्त कमी पडली इतकी मतं, कारण समोर Video
सर्व पहा

कारेगाव गणातून झालेल्या पराभवानंतर माजी सरपंच निर्मला नवले यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करण्यात आला. तसेच, कार्यकर्त्यांकडून जास्त काम करून घेण्यासाठी दारू आणि ड्रग्सचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात त्यांच्या गावातील सुमारे 30 ते 40 तरुण ड्रग्सच्या आहारी गेलेत, असा आरोपही त्यांनी केला. हा पराभव अपेक्षित नव्हता, पण या निवडणुकीत पैशाचा पाण्यासारखा वापर करण्यात आला, ड्रग्सचा वापर करून तरुणांना कामासाठी रात्रभर जागं ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. माझा मतदार पुढील पाच वर्षांसाठी विकला गेला, ही भावना अत्यंत दुःखद असल्याचं त्यांनी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय अजित दादा पवार यांची आठवण काढत, सध्याचं राजकारण खूप खराब झालं असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Politics/
रिलस्टार निर्मला नवले जिंकल्या असत्या, फक्त कमी पडली इतकी मतं, कारण समोर Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल