advertisement

Rahuri Election: मैदान सोडलं की रणनीती बदलली? राहुरीत ज्याच्या उमेदवारीची चर्चा, तोच उमेदवार नॉट रिचेबल, अहिल्यानगरमध्ये खळबळ

Last Updated:

Rahuri ByElection: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच आता, राहुरी पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे.

मैदान सोडलं की रणनीती बदलली? राहुरीत ज्याच्या उमेदवारीची चर्चा, तोच उमेदवार नॉट रिचेबल, अहिल्यानगरमध्ये खळबळ
मैदान सोडलं की रणनीती बदलली? राहुरीत ज्याच्या उमेदवारीची चर्चा, तोच उमेदवार नॉट रिचेबल, अहिल्यानगरमध्ये खळबळ
साहेबराव कोकणे, अहिल्यानगर: राज्यात बारामती आणि राहुरी या दोन पोटनिवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच आता, राहुरी पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे अचानक 'नॉट रीचेबल' झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तनपुरे उमेदवारी अर्ज भरण्याच्या मनस्थितीत नसल्याची चर्चा जोर धरत असून, त्यांच्या जागी आता गोविंद मोकाटे यांचे नाव आघाडीवर आले आहे.
advertisement

महाविकास आघाडीत पेच?

राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून खल सुरू होता. प्राजक्ता तनपुरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या 'नॉट रीचेबल' भूमिकेमुळे आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, उमेदवारीबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.
advertisement

मोकाटेंच्या नावाची चर्चा का?

प्राजक्ता तनपुरे जर रिंगणातून बाहेर पडले, तर ऐनवेळी पर्यायी उमेदवार म्हणून गोविंद मोकाटे यांचे नाव चर्चेत आले आहे. मोकाटे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडी ही जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मोकाटे यांच्या सक्रियतेमुळे राहुरीचे राजकीय समीकरण आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
प्राजक्ता तनपुरे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. ते खरंच निवडणुकीतून माघार घेणार की ही त्यांची काही राजकीय रणनीती आहे, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तनपुरे यांच्या निर्णयावर राहुरी विधानसभेचे भवितव्य अवलंबून आहे.
advertisement
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवताना २०१९ मध्ये भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून १, ९७, ३९२ मतांनी विजयी झाले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahuri Election: मैदान सोडलं की रणनीती बदलली? राहुरीत ज्याच्या उमेदवारीची चर्चा, तोच उमेदवार नॉट रिचेबल, अहिल्यानगरमध्ये खळबळ
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement