advertisement

प्रवाशांना मोठा दिलासा! विरारला आता गर्दीतून प्रवास करत जाण्याची गरज संपणार; महत्त्वाच काम पूर्ण

Last Updated:

15 डब्यांच्या लोकल गाड्या चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. 3 आणि 4 च्या विस्तारासाठी आणि डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. 1 A, 1 आणि 2 च्या विस्तारासाठी डाऊन आणि अप धीम्या मार्गावर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. तर, रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू असेल. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली स्थानका दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने विरार रेल्वे स्थानकावर महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3A आणि 4A यांची रुंदी 4 मीटरने वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे आता लांब लोकल गाड्या येथे सहज थांबू शकतील. हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) यांनी केवळ 4 महिन्यांत पूर्ण केले आहे.
याशिवाय स्थानकाच्या पश्चिम बाजूस नवीन होम प्लॅटफॉर्म क्रमांक 5A उभारण्यात आला आहे. या सुविधेमुळे स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. परिणामी प्रवाशांची गर्दी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
या सुधारणांनंतर विरार स्थानकावर 15 कोचच्या लोकल सेवा लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि रेल्वेची एकूण वहन क्षमता वाढेल.
advertisement
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुधारित प्लॅटफॉर्म लवकरच पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. दरम्यान, MRVC आणि पश्चिम रेल्वे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून रविवारी 15 डब्यांच्या लोकलची यशस्वी चाचणी पार पडली. विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेली ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून स्थानकांची क्षमता वाढवणे आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणे यावर भर दिला जात आहे.
advertisement
MRVC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे विभागातील रेल्वे सेवांमध्ये मोठी सुधारणा होईल. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत आणि लोकल सेवांवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेत ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांना मोठा दिलासा! विरारला आता गर्दीतून प्रवास करत जाण्याची गरज संपणार; महत्त्वाच काम पूर्ण
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement