L,L,L,L,L...चेन्नईला पराभवाची साडेसाती! MS Dhoni कधी येणार? ऋतुराज गायकवाडने दिली मोठी अपडेट! काय म्हणाला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ruturaj Gaikwad On MS Dhoni Comeback From Injury : धोनी सध्या दुखापतीतून सावरत असून तो लवकरच पूर्णपणे फिट होईल, असा विश्वास ऋतुराजने व्यक्त केला आहे.
Ruturaj Gaikwad On MS Dhoni Comeback : राजस्थानविरुद्ध पराभव, पंजाबविरुद्ध पराभव अन् आता आरसीबीविरुद्ध पराभव... चेन्नई सुपर किंग्जच्या मागे पराभवाची साडेसाती काही संपेना, अशी परिस्थिती उभा राहिली आहे. मागील 8 सामन्यात चेन्नईच्या पदरी पराभवच आल्याचं पहायला मिळतंय. ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीत चेन्नईला विजयाचा सूर गवसत नसल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता सीएसकेचा बॅकबोन आणि संकटमोचक धोनी कधी कमबॅक करणार? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर आता ऋतुराज गायकवाड याने उत्तर दिलंय.
धोनी लवकरच पूर्णपणे फिट होईल - ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने महेंद्रसिंह धोनीच्या फिटनेसबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे. धोनी सध्या दुखापतीतून सावरत असून तो लवकरच पूर्णपणे फिट होईल, असा विश्वास ऋतुराजने व्यक्त केला आहे. 44 वर्षीय धोनी सध्या 'काफ स्ट्रेन' (स्नायू दुखापत) मुळे त्रस्त असून त्याच्यावर रिहॅबिलिटेशन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळतीये. ऋतुराजने धोनीच्या फिटनेसवर पूर्ण माहिती दिली.
advertisement
धोनी दोन आठवडे खेळू शकणार नाही - ऋतुराज गायकवाड
महेंद्रसिंग धोनी या स्पर्धेच्या 19 व्या एडिशनमधील पहिले दोन आठवडे खेळू शकणार नाही. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या टीमसाठी हा मोठा धक्का मानला जात असला, तरी चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे धोनीच्या रिकव्हरीचा वेग चांगला आहे. तो मैदानात परतण्यासाठी सध्या मेहनत घेत आहे, असं ऋतुराजने सांगितलं.
advertisement
ऋतुराज एकटा पडलाय
दरम्यान, धोनी सध्या योग्य मार्गावर असून हळूहळू रिकव्हर होत आहे. धोनी स्वतः खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे, पण आपल्याला माहित आहे की कधीकधी दुखापतीतून सावरण्यासाठी थोडा वेळ लागतो, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला. महेंद्रसिंग धोनी सध्या चेन्नईच्या डगआऊटमध्ये देखील दिसत नाही. त्यामुळे ऋतुराज एकटा पडल्याचं पहायला मिळतंय. संजू त्याला साथ देत असताना आता थाला आल्यावर कॅप्टन्सीबाबत कोणता निर्णय घेतला जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 9:51 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
L,L,L,L,L...चेन्नईला पराभवाची साडेसाती! MS Dhoni कधी येणार? ऋतुराज गायकवाडने दिली मोठी अपडेट! काय म्हणाला?









