CSK vs RCB : ना टीम डेव्हिडची बॅटिंग, ना भूवीची बॉलिंग! एका No Ball मुळे चेन्नईने गमावली मॅच! 17.4 ओव्हरमध्ये काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
CSK vs RCB, Anshul Kamboj No Ball : आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात एक नो बॉल संपूर्ण आरसीबीच्या फायद्याचा ठरला अन् चेन्नईने इथंच मॅच गमवाली.
Royal challengers bengaluru vs chennai super kings : चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला अन् सलग दुसरा विजय नोंदवला आहे. आरसीबीने 250 धावांचा डोंगर रचला होता. त्याला प्रत्युत्तर देताना चेन्नईची टीम 206 धावाच करू शकली. त्यामुळे आरसीबीला दुसरा विजय मिळवणं शक्य झालं अन् चेन्नईचा सलग तिसरा पराभव झालाय. या मॅचमध्ये एका नो बॉलने चेन्नईचा गेम केल्याचं पहायला मिळालं.
चेन्नईच्या हातातून मॅच गेली
सुरूवातीला हळूवार सुरुवात झाल्यानंतर आरसीबीने गियर चेंज केले अन् फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने आक्रमण केलं. त्यानंतर पेड्डीकलने अन् रजतने बॉलला हवेत ठेवणं पसंत केलं अन् सिक्सचा पाऊस पाडला. त्यानंतर आलेल्या टीम डेव्हिडने तर कहरच केला. टीम डेव्हिडने आरसीबीच्या बॉलर्सला धू धू धुतलं अन् 70 धावांची आक्रमक खेळी केली. कॅप्टन रजत पाटीदारने देखील या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. त्याने अवघ्या 19 बॉल्समध्ये नाबाद 48 रन्सची झंझावाती खेळी केली. पण यावेळीच चेन्नईच्या हातातून मॅच गेली. मॅचची 18 वी ओव्हर घेऊन अंशुल कंबोज आला.
advertisement
Cleaned up by a yorker… but wait, NO BALL!
Free hit follows and David says thank you very much! #TATAIPL 2026 | #RCBvCSK | LIVE NOW https://t.co/2TGcMIndez pic.twitter.com/wByiXfTJkS
— Star Sports (@StarSportsIndia) April 5, 2026
advertisement
अंशुल कंबोजचा नो बॉल पडला भारी
अंशुल कंबोजने 18 व्या ओव्हरमध्ये टाईट बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला पण टीम डेव्हिडने सुट्टी दिली नाही. तोपर्यंत आरसीबी 200 धावांवर पोहोचली होती, पण ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अंशुलने टीम डेव्हिडची विकेट उडवली. डेव्हिडचा दांड्या उडाल्या. पण अंपायरने अंशुलची चूक लगेच ओळखली. अंशुलने नो बॉल टाकला होता अन् टीम डेव्हिलला जीवनदान मिळालं. याचनंतर टीम डेव्हिडने आक्रमक खेळी केली अन् 250 धावांचा डोंगर उभा केला.
advertisement
दोन्ही सलामीवीर चुकीचा शॉट खेळून आऊट
दरम्यान, आरसीबीने 250 धावांचा डोंगर उभा केल्याने सीएसकेचं मनोबल खचलं. ऋतुराज आणि संजू दोन्ही सलामीवीर चुकीचा शॉट खेळून आऊट झाले. चेन्नईच्या हावभावावरून टीम पूर्णपणे खचल्याचं दिसून आलं होतं. चेन्नईचे तिन्ही टॉप ऑर्डर खेळाडू आऊट झाल्याने चेन्नईला अखेरपर्यंत झुंज देऊन देखील विजय मिळवता आला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 8:47 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK vs RCB : ना टीम डेव्हिडची बॅटिंग, ना भूवीची बॉलिंग! एका No Ball मुळे चेन्नईने गमावली मॅच! 17.4 ओव्हरमध्ये काय घडलं?







