advertisement

गौरव मोरेच्या बायकोचा स्वॅगच निराळा! थेट साऊथच्या सुपरस्टारसोबत शेअर केली स्क्रीन, 'या' बॉलिवूड दिग्दर्शकाशी खास कनेक्शन

Last Updated:
Who Is Gaurav More Wife: गौरवची पत्नी ही केवळ त्याची बेटर हाफ नसून ती स्वतः देखील ग्लॅमर विश्वातील एक ओळखीचा चेहरा आहे. तिने थेट साऊथ सुपरस्टार स्क्रीन शेअर केली आहे.
1/8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम आणि प्रेक्षकांचा लाडका 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच अभिनेता गौरव मोरेने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. कोणालाही कानोकान खबर लागू न देता गौरव मोरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे.

2/8
गौरवने आपल्या लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र, त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही गोड बातमी कळाली.

3/8
ऋतुजाने गौरव आणि त्याची पत्नी प्रियंका कारेकर यांचा फोटो शेअर करत त्यांना
ऋतुजाने गौरव आणि त्याची पत्नी प्रियंका कारेकर यांचा फोटो शेअर करत त्यांना "मिस्टर अँड मिसेस मोरे" म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये प्रियंकाच्या गळ्यातलं मंगळसूत्र, हातावरची मेहंदी आणि हिरवा चुडा पाहून गौरवने गुपचूप लग्नाची गाठ बांधल्याचं स्पष्ट झालं आहे.
advertisement
4/8
विशेष म्हणजे गौरवची पत्नी ही केवळ त्याची बेटर हाफ नसून ती स्वतः देखील ग्लॅमर विश्वातील एक ओळखीचा चेहरा आहे. प्रियंका कारेकर ही केवळ गौरवची पत्नी नसून ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री आहे.

5/8
जरी प्रियंका मराठी मालिकांमध्ये फारशी दिसली नसली, तरी तिने थेट साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. यासंबंधीचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत या बड्या स्टारसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

6/8
आर. बालकी दिग्दर्शित 'चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या २०२२ साली रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटात प्रियंकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सनी देओल, दुलकर सलमान, अमिताभ बच्चन आणि पूजा भट्ट सारखे दिग्गज कलाकार होते.

7/8
गौरवसाठी हा काळ दुहेरी आनंदाचा ठरला आहे. त्याने केवळ आयुष्याची जोडीदारच निवडली नाही, तर आपल्या कष्टाच्या कमाईतून मुंबईत हक्काचं घरही घेतलं आहे.

8/8
लग्नानंतर गौरव आणि प्रियंकाने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला असून, एकाच वेळी दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement