advertisement

24 तासांत 4 मर्डर, गँगवॉरमधून झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर नांदेडमध्ये आणखी एका तरुणाची हत्या, तलवारीने केले सपासप वार

Last Updated:

नांदेड शहरात सध्या गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरात मोठं गँगवॉर घडलं. यात तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आणखी एकाची एकाची हत्या झाली आहे.

nanded news
nanded news
नांदेड शहरात सध्या गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड शहरातील ई-स्क्वेअर डी-मार्ट परिसरात मोठं गँगवॉर घडलं. यात तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिहेरी हत्याकांडाची ही घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री जुना मोंढा भागातील मुरमुरा गल्लीत एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रणजितसिंग तबेलेवाले उर्फ रज्जा (वय ३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी दोन हल्लेखोरांनी धारदार तलवारीने रणजितसिंगवर सपासप वार केले. या हल्ल्यात रणजितसिंग गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement

पोलिसांची तत्पर कारवाई: दोन आरोपी गजाआड

या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ५ एप्रिल रोजी पहाटेच दोन्ही आरोपींना अटक केली.
मनप्रितसिंग परविंदरसिंग काचवाले (२३ वर्षे) आणि परमज्योतसिंग परविंदरसिंग काचवाले (२५ वर्षे) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोन्ही आरोपी अबचलनगर, नांदेड येथील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नांदेडमध्ये आधीच तिहेरी हत्याकांडाची घटना घडली असताना आणखी एका तरुणाची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
24 तासांत 4 मर्डर, गँगवॉरमधून झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर नांदेडमध्ये आणखी एका तरुणाची हत्या, तलवारीने केले सपासप वार
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement