CSK चा सलग तिसरा पराभव, ऋतुराज रडकुंडीला आला! RCB च्या एका खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, काय म्हणाला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ruturaj Gaikwad Statement loss Against RCB : जर त्याने स्वतः टॉप ऑर्डरमध्ये अधिक धावा केल्या असत्या, तर कदाचित टीमने हे टार्गेट पूर्ण केलं असतं, असं म्हणत ऋतुराजने संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेवर पराभवाचं खापर फोडलं.
Ruturaj Gaikwad Blame One RCB Player : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि सीएसके यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने दणक्यात विजय मिळवला असून सीएसकेला सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीखाली चेन्नईला 250 धावांचं आव्हान पार करता आलं नाही अन् आरसीबीने 43 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड हताश झाल्याचं पहायला मिळालं. पराभवानंतर त्याने खालच्या आवाजात प्रतिक्रिया दिली.
जर टॉप ऑर्डरमध्ये धावा केल्या असत्या तर...
प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही या निकालाचं आश्चर्य वाटलं आहे, पण आमच्या टीमने शेवटपर्यंत दिलेला लढा कौतुकास्पद होता, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला. यावेळी ऋतुराजने लोअर ऑर्डरमधील बॅटर्सचे विशेष कौतुक केलं. सरफराज खान, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन आणि शिवम दुबे यांनी जिद्दीने लढा दिला. जर टॉप ऑर्डरमध्ये अधिक धावा केल्या असत्या, तर कदाचित टीमने हे टार्गेट पूर्ण केलं असतं, असं म्हणत ऋतुराजने संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेवर पराभवाचं खापर फोडलं. तसेच त्याने स्वत:ला देखील जबाबदार धरलं आहे.
advertisement
नो बॉलमुळे मॅचचा टर्निंग पॉईंट
मॅचमध्ये टीम डेव्हिडने केलेल्या फटकेबाजीवरही ऋतुराजने भाष्य केले असून एका नो बॉलमुळे मॅचचा टर्निंग पॉईंट बदलल्याचं सांगितलं. अंशुलने डेव्हिडला जवळजवळ आऊट केलं होतं पण तो नो बॉल ठरला होता, असं म्हणत ऋतुराजने चेन्नईची सर्वात मोठी चूक सांगितली. जर आम्ही सुरुवातीलाच विराट कोहलीला आऊट करण्याची संधी साधली असती, तर मॅचचे मोमेंटम आमच्या बाजूने राहिलं असतं, असं मत देखील ऋतुराजने नोंदवलं आहे.
advertisement
Dopamine stuff pic.twitter.com/UppzkwfWxa
— Sankalp Ayan (@CjvFanatic) April 5, 2026
सीएसके बॅकफूटवर गेली
अशातच चेन्नईची पकड या मॅचवर 13 व्या किंवा 14 व्या ओव्हरपर्यंत कायम होती, मात्र त्यानंतर चित्र बदललं. मधल्या ओव्हर्समध्ये मॅचचे पारडे पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने झुकलं होतं आणि तिथूनच सीएसके बॅकफूटवर गेली. पराभवानंतरही ऋतुराजने आपल्या खेळाडूंच्या लढवय्या वृत्तीचं समर्थन केलं अन् आगामी सामन्यात चुकांवर काम करून पुन्हा मैदानात उतरण्याची इच्छा ऋतुराजने व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 7:21 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK चा सलग तिसरा पराभव, ऋतुराज रडकुंडीला आला! RCB च्या एका खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, काय म्हणाला?







