advertisement

पुणेकरांनो, जरा जपून! आता नवले पुलावर हायटेक पहारा; तुमच्यावर 24 तास असणार पोलिसांची नजर, मोठी अपडेट

Last Updated:

आता या मार्गावर २४ तास 'रिअल-टाइम' मॉनिटरिंग करणे शक्य होणार आहे. त्यामुळे, पुणेकरांनी या मार्गावरून प्रवास करताना आता अधिक सावध राहाणं गरजेचं आहे.

आता नवले पुलावर हायटेक पहारा (फाईल फोटो)
आता नवले पुलावर हायटेक पहारा (फाईल फोटो)
पुणे: नवले पूल परिसरात वारंवार अनेक भीषण अपघात झाले आहेत. याच अपघातांची मालिका रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मोठे पाऊल उचलले आहे. यात या संपूर्ण पट्ट्यात १४ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे थेट पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडले गेले आहेत. यामुळे आता या मार्गावर २४ तास 'रिअल-टाइम' मॉनिटरिंग करणे शक्य होणार आहे. त्यामुळे, पुणेकरांनी या मार्गावरून प्रवास करताना आता अधिक सावध राहाणं गरजेचं आहे.
नियम मोडल्यास 'ऑटोमॅटिक' कारवाई
नवले पुलाचा तीव्र उतार आणि जड वाहनांची वर्दळ लक्षात घेता, प्रशासनाने या मार्गावरील वेगमर्यादेत मोठी कपात केली आहे. यापूर्वी ६० किमी प्रतितास असलेली वेगमर्यादा आता ४० किमी प्रतितास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४० पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्यांद्वारे आपोआप दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
रंबल स्ट्रिप्स: कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंत वाहनांचा वेग नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी २० मिमी उंचीचे रंबल स्ट्रिप्स बसवण्यात आले आहेत.
advertisement
डिजिटल डिस्प्ले बोर्ड: वाहनचालकांना हवामान, रस्ता आणि वाहतुकीची ताजी माहिती देण्यासाठी ३ नवीन डिजिटल बोर्ड लावले जात आहेत.
सुरक्षा चिन्हे: मार्गावर रिफ्लेक्टिव्ह कॅट-आइज, लेन मार्किंग, ब्लिंकर्स आणि धोक्याचे इशारा फलक लावून रस्ता सुरक्षित करण्यात आला आहे.
"नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी आम्ही तत्काळ प्रतिसाद प्रणालीवर भर दिला आहे. कॅमेरे पोलीस यंत्रणेशी जोडल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २४ तास नजर ठेवणे आता शक्य झाले आहे." - संजय कदम, प्रकल्प संचालक, NHAI, पुणे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, जरा जपून! आता नवले पुलावर हायटेक पहारा; तुमच्यावर 24 तास असणार पोलिसांची नजर, मोठी अपडेट
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement