advertisement

Local Train : लोकलचा प्रवास आता बदलणार?,आता 'जपानी' शिस्त येणार; हायकोर्टाचा रेल्वेला मोठा आदेश

Last Updated:

Mumbai Local : मुंबई लोकलमधील अपघात रोखण्यासाठी न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. नेमका हा निर्णय कोणता आहे आणि कधीपासून अमलात येईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई लोकलचा प्रवास आता होणार सुरक्षित
मुंबई लोकलचा प्रवास आता होणार सुरक्षित
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आणि त्यातून होणारे अपघात हे सध्याचे चित्र बनत आहे. मात्र आता वाढते अपघात रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मुंबईकरांना गर्दीतून दिलासा मिळणार?
उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला स्पष्ट सूचना देत म्हटले की प्लॅटफॉर्मवर सध्या असलेल्या पिवळ्या रेषेऐवजी आता तिथं लाल रंगाची ठळक रेषा काढण्यात याव्यात. शिवाय न्यायालयाने नमूद केल, सध्या जी प्लॅटफॉर्मवर पिळळी रेषा आहे ती फिकट झाली आहे आणि प्रवाशांच्या नजरेत सहज येत नाही, त्यामुळे नकळतपणे प्रवासी रेषा ओलांडतात आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होते. आता या समस्येवर उपाय म्हणून लाल रंगाची रेषा जी अधिक स्पष्ट पणे दिसेल आणि प्रवाशांना थांबण्याची जाणीव ती रेषा करुन देईल.
advertisement
मुंबई लोकलमध्ये आता 'जपानी शिस्त' येणार?
न्यायालयाने उदाहरण देताना जपानमधील नागरिकांचाही विशेष उल्लेख केला. तेथील लोक नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करतात आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखतात. आता तशीच सवय आपल्या देशातही लागावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबईतील लोकल प्रवास हा लाखो नागरिकांच्या दररोजच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. त्या गोष्टीमुळेच प्रत्येक प्रवाशाने स्वत:ची आणि अन्य प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Local Train : लोकलचा प्रवास आता बदलणार?,आता 'जपानी' शिस्त येणार; हायकोर्टाचा रेल्वेला मोठा आदेश
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement