नांदेडमध्ये 48 तासात 5 खून, पाठलाग करत तरुणावर वार, भररस्त्यात संपवलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नांदेड शहर सध्या मर्डर हब बनलं आहे. गेल्या 48 तासात नांदेड शहरात एक दोन नव्हे तर तब्बल पाच खून झाले आहेत.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड शहर सध्या मर्डर हब बनलं आहे. गेल्या 48 तासात नांदेड शहरात एक दोन नव्हे तर तब्बल पाच खून झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड शहरातील कॅनाल रोड परिसरातील डीमार्टजवळ गँगवॉरची घटना घडली. यातून दोन्ही टोळ्यांमधील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण नांदेड शहरासह महाराष्ट्रात खळबळ उडाली. गँगवॉरची ही घटना ताजी असताना आता शहरात पुन्हा दोन जणांचा खून करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री नांदेड शहरातील मुरमुरा गल्लीत रंजितसिंग तबेलेवाले या तरुणाचा खून झाला. त्याच्यावर दोन जणांनी तलवारीने सपासप वार केले. यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा नांदेड शहर खुनाने हादरलं आहे. आज सकाळी सहा वाजता नांदेड शहरातील श्रीनगर भागात सोनू कल्याणकर या 35 वर्षे तरुणाचा खून करण्यात आला. भर रस्त्यावर ही घटना घडली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार मारेकऱ्यांनी सोनू कल्याणकर याला रस्त्यावर गाठून धारदार शस्त्राने हल्ला केला. सोनू कल्याणकर त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनूचा खून नेमका कोणत्या कारणातून केला? हे अद्याप समोर आलं नाही. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. गुन्ह्याचा तपास केला जात आहे.
advertisement
सोनू कल्याणकर याच्यावर तीन वर्षांपूर्वी देखील जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. मात्र या गोळीबारातून सोनू बचावला होता. गोल मंगनाळे सध्या तुरुंगात आहे. सोनू कल्याणकर हा तरुण राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याची हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मात्र मागील ४८ तासांत शहरात पाच हत्येच्या घटना घडल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 10:06 AM IST








