advertisement

पुणे-सोलापूर महामार्गावरील ते हॉटेल; रात्री अचानक पोहोचले पोलीस, महिला अन् 15 पाकिटं, आतलं दृश्य पाहून खळबळ

Last Updated:

३ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी स्त्रिया आणि मुलींकडून अनैतिक देहव्यापार करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर छापा (प्रतिकात्मक फोटो)
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर छापा (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : वर्दळीच्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुन्हा एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गागरगाव हद्दीत असलेल्या एका हॉटेल आणि लॉजमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी याठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 'हॉटेल कल्याण ॲग्रो' आणि 'हॉटेल ९६ कट्टा' या ठिकाणी अनैतिक देहव्यापार चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला.
पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. ३ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी स्त्रिया आणि मुलींकडून अनैतिक देहव्यापार करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.
advertisement
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. महिला पोलीस हवालदारांनी तेथील महिला एजंटची झडती घेतली असता तिच्याकडे २,००० रुपये रोख मिळून आले. पोलिसांनी एकूण ३,३७५ रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत केला आहे.
गुन्हा दाखल
महिला पोलीस फौजदार शुभांगी खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक दीपक उर्फ ज्ञानदेव सिताराम ढवळे आणि संबंधित महिला एजंट यांच्यावर 'अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६' च्या कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विलास नाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-सोलापूर महामार्गावरील ते हॉटेल; रात्री अचानक पोहोचले पोलीस, महिला अन् 15 पाकिटं, आतलं दृश्य पाहून खळबळ
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement