शोरमा गर्ल आणि वाद संपता संपेना
शोरमा गर्लच्या सोशल मिडिया अकाउंटवर दोन नवे व्हिडिओ अपलोड करण्यात आले असून,त्यामध्ये नुकताच घडलेला संपूर्ण वाद सविस्तरपणे पाहायला मिळत आहे. हे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
शोरमा गर्लचा आधीचा वाद काय होता?
डोंबिवलीतील मराठी तरुणी एकता सावंत डोंबिवली पूर्व स्टेशनजवळ शोरमाचा स्टॉल लावत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कायद्याचा धाक दाखवत तिला स्टॉल लावू दिला जात नव्हता. स्थानकापासून 150 मीटरच्या आत स्टॉल येत असल्याने तिच्यावर वारंवार कारवाई होत होती.
advertisement
एकताच्या मते, तिच्या बाजूलाच असलेल्या अनेक परप्रांतीयांच्या स्टॉलवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नव्हती. याबाबतचा तिचा आरोप असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे व्हिडिओ थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाहिले. व्यवसायावर होत असलेल्या कारवाईमुळे रडणाऱ्या एकताचा व्हिडिओ पाहून राज ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत अविनाश जाधव यांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत येऊन एकता सावंतची भेट घेतली आणि काही दिवसांत तिला त्याच ठिकाणी नवा शोरमा स्टॉल सुरू करून दिला.
पुन्हा नेमका वाद कशावरून?
व्हायरल होत असलेल्या पहिल्या व्हिडिओत एकता सांवत ही एका वृद्ध महिलेशी बोलताना दिसत आहे. ज्यात ती,''त्या महिलेचा स्टॉल तिच्या शोरमा स्टॉलपासून जवळ नको असे सांगत आहे, मात्र ती महिला एकताचे काहीही ऐकण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे'' दुसराही स्टॉल एकताच्या स्टॉलजवळ लावल्याने तिच्या स्टॉलवर येणार्या ग्राहकांना अडथळा होत आहे असे एकताचे म्हणणे आहे.
View this post on Instagram
दारु पिऊन शिवीगाळ केल्याचा आरोप
इन्स्टाग्रामवरील दुसऱ्या व्हिडिओत समोरच्या व्यक्तींनी दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप एकता सावंत हिने केला असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एकताचे व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''sawant_shawarma'' या अकाउंटवर अपलोड केलेले आहेत. काही वेळात नेटकऱ्यांनी आपली मतं त्यावर व्यक्त केलेली आहेत. एका यूजरने म्हटलं की,''ही बाई कुठून आली आता... एखाद्याच चांगलं होतंय ते बघवत नाही लोकांना'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''ह्यांना भैयान चा त्रास नाय होत आपल्या पोर पोरींच लगेच त्रास होतो,तिचा धंदा होत नाही म्हणून जळते ही काकू'' तर अनेक अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
