TRENDING:

फूड बिझनेस सुरू करताय? मुंबईत अवघ्या 30 रुपयांत एक डझन प्लेट, कुठं आहे स्वस्तात मस्त मार्केट? Video

Last Updated:

Mumbai Shopping: या ठिकाणी मेलामाईनपासून तयार केलेल्या प्लेट्सचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. अगदी 30 रुपये डझनपासून मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई म्हटलं की अनेकांना इथले प्रसिद्ध मार्केट आठवतात. स्वस्तात मस्त खरेदीसाठी अनेकजण या ठिकाणांना प्राधान्य देतात. आता सर्वच शहरात खाद्यपदार्थांच्या व्यवसायाची मोठी वाढ होताना दिसते. अनेकजण स्वतःचा कॅफे, छोटे हॉटेल, रेस्टॉरंट किंवा फूड स्टॉल सुरू करण्याचा विचार करतात. अशा वेळी कमी खर्चात, टिकाऊ आणि दिसायला आकर्षक भांडी मिळणे ही मोठी गरज असते. हीच गरज ओळखून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये मेलामाईन प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या प्लेट्स, बाऊल्स आणि किचनवेअरची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
advertisement

या ठिकाणी मेलामाईनपासून तयार केलेल्या प्लेट्सचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. लहान स्नॅक्स प्लेट्स, ब्रेकफास्ट प्लेट्स, मीडियम साईज प्लेट्स, डिनर प्लेट्स, फुल प्लेट्स तसेच मोठ्या सर्व्हिंग प्लेट्स येथे उपलब्ध आहेत. या प्लेट्समध्ये प्लेन रंगांच्या, मल्टिकलर, फ्लॉवर प्रिंट, जिओमेट्रिक डिझाईन, मॅट फिनिश, ग्लॉसी फिनिश, मार्बल लूक, वुडन पॅटर्न, स्टोन टेक्स्चर आणि मॉडर्न आर्ट प्रिंट अशा जवळपास 30 हून अधिक डिझाईन्सचा समावेश आहे.

advertisement

Shocking News : शॉपिंगसाठी दुकानात पोहोचले; पण एका चुकीने तरुणांसोबत भयंकर घडलं; विरार हादरले

बाऊल्सच्या अनेक व्हरायटी

प्लेट्सप्रमाणेच येथे बाऊल्सचेही मोठे व्हरायटी आहे. सूप बाऊल्स, सॅलड बाऊल्स, करी बाऊल्स, राईस बाऊल्स, नूडल्स बाऊल्स, डेझर्ट बाऊल्स, आईस्क्रीम बाऊल्स, फ्रूट बाऊल्स तसेच छोट्या साईजचे चटणी आणि सॉस बाऊल्स उपलब्ध आहेत. गोल, चौकोनी, ओव्हल आणि डीप शेपमध्ये हे बाऊल्स मिळतात.

advertisement

याशिवाय येथे कप्स आणि मग्सचेही विविध प्रकार आहेत. चहा-कॉफीसाठी कप्स, हँडल असलेले मग्स, ग्लाससारखा लूक असलेले कप्स, डिझायनर प्रिंट कप्स तसेच सॉसरसह कप्सही मिळतात. हे सर्व दिसायला प्लास्टिकसारखे वाटतात, मात्र मेलामाईन मटेरियलचे असल्यामुळे अधिक मजबूत असून सहज तुटत नाहीत.

किंमत काय?

किंमतींबाबत बोलायचे झाल्यास, येथे भांडी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. छोट्या साईजच्या प्लेट्स साधारण 30 रुपयांत एक डझन मिळतात, तर मोठ्या साईजच्या प्लेट्स 90 रुपयांत एक डझनपर्यंत उपलब्ध आहेत. म्हणजेच बहुतेक सर्व प्लेट्स शंभर रुपयांच्या आतच एक डझनमध्ये मिळतात.

advertisement

या बाजारात होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे खरेदी करता येते. होलसेल खरेदीसाठी पूर्ण सेट घ्यावा लागतो. मात्र ग्राहकांना सिंगल पीस खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. सिंगल पीस घेतल्यास एका प्लेटची किंमत साधारण 30 रुपये, 40 रुपये किंवा 90 रुपये अशा वेगवेगळ्या दरात असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांसोबतच सामान्य ग्राहकांनाही येथे सहज खरेदी करता येते.

advertisement

या बाजारात ट्रे, सर्व्हिंग बाऊल्स, डिनर सेट्स, सूप सेट्स, ब्रेकफास्ट सेट्स, कटलरी स्टँड, स्पून होल्डर, टिश्यू स्टँड तसेच किचनमध्ये लागणाऱ्या इतर अनेक वस्तूही मिळतात. त्यामुळे घरगुती वापरापासून ते व्यावसायिक वापरासाठी एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुंबईचा काळा घोडा फेस्टिव्हल पुण्यानं गाजवला, इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं, काय
सर्व पहा

ही बाजारपेठ क्रॉफर्ड मार्केटमध्ये, जुम्मा मज्जिदच्या बाजूला असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू मिळणाऱ्या गल्लीत आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फूड बिझनेस सुरू करताय? मुंबईत अवघ्या 30 रुपयांत एक डझन प्लेट, कुठं आहे स्वस्तात मस्त मार्केट? Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल