Summer Care : उन्हाळ्यातलं टॅनिंग घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, नैसर्गिक स्क्रबनं त्वचा राहिल स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
टॅनिंग घालवण्यासाठी संतुलन आणि योग्य पोषणाची आवश्यकता असते. आयुर्वेदात त्वचेच्या काळजीसाठी अनेक प्रभावी उपाय आहेत, त्यापैकी एक म्हणजे नैसर्गिक स्क्रब. संत्र्यांच्या सालीचा उपयोग त्वचेला होतोच पण त्याच आणखी काही जिन्नस वापरले तर चेहऱ्याचं सौंदर्य कडक उन्हाळ्यातही उठून येईल.
मुंबई : उन्हाळा सुरू झाला की, त्वचेवर त्याचे परिणाम दिसतात. अनेकांची त्वचा काळवंडते. कडक उन्हाचा सर्वाधिक परिणाम चेहरा, पाय, मान आणि हातांवर होतो.
उष्णता आणि घामामुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. आयुर्वेदात यासाठी एक सोपा स्क्रब सुचवला आहे. सूर्याच्या सततच्या किरणांपासून संरक्षण करण्यासाठी, त्वचा मेलॅनिन नावाचं संप्रेरक तयार करतं आणि त्वचेचा रंग एकसारखा राहत नाही.
advertisement
टॅनिंग घालवण्यासाठी संतुलन आणि योग्य पोषणाची आवश्यकता असते. आयुर्वेदात त्वचेच्या काळजीसाठी अनेक प्रभावी उपाय आहेत, त्यापैकी एक म्हणजे नैसर्गिक स्क्रब. संत्र्यांच्या सालीचा उपयोग त्वचेला होतोच पण त्याच आणखी काही जिन्नस वापरले तर चेहऱ्याचं सौंदर्य कडक उन्हाळ्यातही उठून येईल.
नैसर्गिक स्क्रब तयार करणंही सोपं आहे. संत्र्याच्या सालीची पावडर, थोडं केशर, ज्येष्ठमध पावडर आणि चंदन पावडर कोरफडीच्या जेलमधे मिसळून पेस्ट बनवा. पेस्ट घट्ट वाटत असेल, तर त्यात गुलाबजल किंवा कच्चं दूध घालू शकता. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा टॅनिंग झालेल्या भागावर लावा.
advertisement
नैसर्गिक स्क्रबचे फायदे: या नैसर्गिक स्क्रबमधे मृत पेशी काढून त्वचा स्वच्छ करण्याची क्षमता असते. त्वचेचा रंग सुधारणं आणि त्वचेच्या खोलवर पोषणासाठीही याची मदत होते.
ज्येष्ठमधामुळे मेलॅनिनचं संतुलन राखलं जातं आणि केशरामुळे त्वचा उजळ करण्यास मदत होते. या मिश्रणातील कोरफडीमुळे उष्णता कमी होते आणि खोलवर थंडावा मिळाल्यानं त्वचेची जळजळ कमी होते. संत्र्याच्या सालीच्या पावडरमधे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. तुम्हाला एलर्जी येत असेल तर आधी पॅच टेस्ट करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 10:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : उन्हाळ्यातलं टॅनिंग घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, नैसर्गिक स्क्रबनं त्वचा राहिल स्वच्छ