Early Menopause : चाळिशीच्या आत रजोनिवृत्ती ठरु शकते धोक्याची घंटा, महिलांच्या आरोग्यासंदर्भातली महत्त्वाची निरीक्षणं
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सामान्यतः रजोनिवृत्ती 45 ते 50 वयोगटात येते, पण जर ती चाळीस वर्षांपूर्वीच आली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 'जामा कार्डिओलॉजी'मधे प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून समोर आलेली माहिती महत्त्वाची आहे. यातली निरीक्षणं महिलांच्या आरोग्यासाठी आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
मुंबई : महिलांच्या आरोग्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळी म्हणजे केवळ प्रजनन क्षमतेचं लक्षण नाही तर शारीरिक मानसिक आरोग्यासाठीही नियमित पाळी येणं महत्त्वाचं आहे.
सामान्यतः रजोनिवृत्ती 45 ते 50 वयोगटात येते, पण जर ती चाळीस वर्षांपूर्वीच आली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 'जामा कार्डिओलॉजी'मधे प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून समोर आलेली माहिती महत्त्वाची आहे. यातली निरीक्षणं महिलांच्या आरोग्यासाठी आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी 1964 ते 2018 या कालावधीतील जवळपास दहा हजार महिलांच्या माहितीचा बारकाईनं अभ्यास केला. ज्या महिलांना वयाच्या चाळिशीपूर्वी रजोनिवृत्ती येते, त्यांना आयुष्यभर हृदयविकाराचा धोका चाळीस टक्क्यांनी वाढतो असं या अभ्यासात आढळून आलं.
advertisement
ही समस्या केवळ एक टक्के महिलांना प्रभावित करते, असं पूर्वी मानलं जात होतं. पण या अभ्यासातून आणखी एक सर्वात चिंताजनक बाब समोर आली आहे. 'ह्युमन रिप्रोडक्टिव्ह ओपन' या जर्नलमधील एका अहवालानुसार आता हा आकडा तीन टक्के ते चार टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक शंभर महिलांपैकी तीन-चार महिला या समस्येचा सामना करत आहेत.
advertisement
मासिक पाळी थांबण्याचा हृदयाशी थेट संबंध आहे. खरं तर, याचा थेट संबंध इस्ट्रोजेन या हार्मोनशी आहे. हे संप्रेरक महिलांच्या शरीरात नैसर्गिक ढालीप्रमाणे काम करतं आणि त्यांच्या हृदयाचं संरक्षण करतं. जेव्हा रजोनिवृत्ती वेळेपूर्वी येते, तेव्हा ही संरक्षक ढाल वेळेपूर्वीच काढून टाकली जाते.
इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात कोणते बदल होतात ते समजून घेऊया.
advertisement
पोटावरील चरबी - वजन वाढते आणि विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.
रक्तवाहिन्या कठीण होणं - रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या कठीण होऊ लागतात.
कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब - वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो.
स्नायू - शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात.
वेळेपूर्वी रजोनिवृत्ती का येते त्याची कारणं समजून घेऊया.
advertisement
बहुतेक प्रकरणांमधे, कोणतंही विशिष्ट कारण नाही, पण काही मुख्य कारणं खालीलप्रमाणे असू शकतात:
अनुवंशिकता - कुटुंबातील आईला किंवा बहिणीला ही समस्या असेल.
ऑटोइम्युन डिसीज - शरीराची रोगप्रतिकार प्रणाली बीजकोशावर हल्ला करते.
संसर्ग किंवा शस्त्रक्रिया - गंभीर संसर्ग किंवा शस्त्रक्रियेमुळे अंडाशय काम करणं थांबवू शकतं.
अयोग्य जीवनशैली - अतिरिक्त ताण, धूम्रपान आणि अयोग्य आहार.
advertisement
घाबरण्यापेक्षा जागरूक राहणं महत्त्वाचं - डॉक्टरांच्या मते, या अभ्यासाच्या निष्कर्षामुळे महिलांनी घाबरुन न जाता, त्यांच्यात जागरूकता निर्माण होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जास्त धोका असं वाटत असेल तर वेळेवर डॉक्टरांशी बोलून सल्ला घ्या.
वेळेपूर्वी रजोनिवृत्ती टाळण्यासाठी काय करायचं ?
advertisement
आहार - आहारात ताजी फळं, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. बाहेरचं आणि जंक फूड खाणं कमी करा.
व्यायाम करा - दररोज किमान तीस मिनिटं चालण्याची किंवा व्यायाम करण्याची सवय लावा.
नियमित तपासणी करा - मासिक पाळी वेळेपूर्वी थांबली असेल, तर कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियमितपणे तपासा.
डॉक्टरांचा सल्ला - तुमचे डॉक्टर हार्मोन थेरपीची शिफारस करू शकतात, ज्यामुळे हा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 7:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Early Menopause : चाळिशीच्या आत रजोनिवृत्ती ठरु शकते धोक्याची घंटा, महिलांच्या आरोग्यासंदर्भातली महत्त्वाची निरीक्षणं







