2 दिवसांआधी झाला बाबा, मुलाला भेटण्यासाठी व्हिलचेअरवरून जाण्याची वेळ; बिग बॉसचा स्पर्धक ओक्शाबोक्सी रडला,VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आपल्या पोटच्या मुलांना पाहण्यासाठी त्याला व्हिलचेअरने हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली. बायको आणि दोन्ही मुलांना पाहताच तो ओक्शाबोक्सी रडू लागला.
बिग बॉसचा एक स्पर्धक, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सध्या खूप चर्चेत आहे. त्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच तो दोन दिवसांआधी बाबा झाला. त्याच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्माची बातमी कळताच तो खूप खुश झाला. पण आपल्या पोटच्या मुलांना पाहण्यासाठी त्याला व्हिलचेअरने हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली. बायको आणि दोन्ही मुलांना पाहताच तो ओक्शाबोक्सी रडू लागला. या फेमस सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या बायको आणि नवजात मुलांना पाहण्यासाठी निघाला आहे. तो व्हिलचेअर असून त्याला नीट उभंही राहता येत नाहीये. दुसरा जन्म माझ्या मुलासाठी असं म्हणत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. मुलाला हातात घेताच तो ओक्शाबोक्शी रडला.
advertisement
आपण बोलत आहोत प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोवालबद्दल. अनुराग नुकताच बाबा झाला. त्याची पत्नी रितिका चौहानने 27 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एका मुलाला जन्म दिला. रितिकाने सोशल मीडियावर बाळाच्या चिमुकल्या पायांचा फोटो शेअर केला होता. मुलांच्या जन्माची माहिती रितिकाने अनुरागला दिली नव्हती अशा चर्चा आहेत. रितिकाने तिच्या पोस्टमध्ये अनुरागला टॅग केले नाही, तसेच अनुरागने वडील झाल्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. दोघांमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या आहेत.
advertisement
advertisement
अनुराग त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. त्याने नुकतेच स्वतःच्या आई-वडिलांवर आणि भावावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. दरम्यान दिल्ली-मेरठ महामार्गावर अनुरागचा अपघात झाला. त्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातानंतर अनुराग बरा होण्यासाठी मित्राच्या फार्महाऊसवर गेला होता. रितिका त्याच्यासोबत राहत नव्हती.
रितिका चौहानने आता मौन सोडले असून आपल्या सासरच्या मंडळींचा बचाव केला आहे. इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्टमध्ये तिने अनुरागने कुटुंबावर केलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. रितिका म्हणाली, ती इन्फ्लुएन्सर नाही याचा अर्थ असा नाही की तिच्याकडे सांगण्यासारखी कहाणी किंवा आवाज नाही. तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्या मुलाच्या निरागसतेसाठी आणि कुटुंबाच्या शांततेसाठी ती कोणतीही नकारात्मकता सहन करणार नाही. रितिका चौहानने लवकरच संपूर्ण सत्य उघड करण्याचे संकेतही दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 6:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 दिवसांआधी झाला बाबा, मुलाला भेटण्यासाठी व्हिलचेअरवरून जाण्याची वेळ; बिग बॉसचा स्पर्धक ओक्शाबोक्सी रडला,VIDEO








