advertisement

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज! पालिकेची नवी नियमावली जाहीर; नियम मोडणाऱ्या मंडळांना दणका

Last Updated:

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान वाढते प्रदूषण आणि उत्सवादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने यंदा अधिक कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

News18
News18
मुंबई : गणेशोत्सवासाठी अद्याप अवकाश असला तरी मुंबई महानगरपालिकेने आत्तापासूनच कंबर कसली आहे. आगामी गणेशोत्सव हा केवळ भव्यच नाही तर तो पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध असावा, या उद्देशाने महापालिकेने मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे.
मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. मुंबईत दहा दिवस हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो. आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने सविस्तर मार्गदर्शक परिपत्रक जारी केले आहे. यंदाच्या उत्सवात पर्यावरणाचे रक्षण आणि सार्वजनिक सुरक्षा या दोन सूत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. वाढते प्रदूषण आणि उत्सवादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने यंदा अधिक कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement

पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यावर भर 

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्तींवरील निर्बंध यंदाही कायम राहतील. त्याऐवजी शाडूची माती आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मूर्ती रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी रासायनिक रंगांना फाटा देऊन केवळ नैसर्गिक आणि पाण्यात विरघळणाऱ्या रंगांचाच वापर करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement

मंडप उभारणीसाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आता बंधनकारक असेल. अनधिकृत मंडपांवर पालिकेचा हातोडा पडणार असून मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
advertisement

मूर्तिकार आणि मंडप उभारणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

  • पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीवर भर देण्याचे निर्देश
  • प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींवर निर्बंध कायम
  • नैसर्गिक रंग, मातीच्या मूर्तींचा वापर प्रोत्साहित
  • मंडप उभारणीसाठी परवानगी प्रक्रिया अनिवार्य
  • अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश
  • ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी वेळेची मर्यादा लागू
  • विसर्जनासाठी निश्चित ठिकाणे व कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन
  • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
advertisement

मुंबईकरांना सहकार्य करण्याचे आवाहन 

उत्सवाच्या काळात होणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला लगाम घालण्यासाठी ध्वनिक्षेपकांच्या वेळेवर मर्यादा घालण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. एकूणच 2026 चा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने यंदा अधिक कडक भूमिका घेतल्याचे या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे. यासाठी मुंबईकरांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त आणि प्रशासनाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज! पालिकेची नवी नियमावली जाहीर; नियम मोडणाऱ्या मंडळांना दणका
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement