Expiry Date आणि Best Before दोघांमध्ये नक्की फरक काय? चुकीच्या समजमुळे बिघडू शकतं तुमचं आरोग्य; वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अर्धवट माहितीमुळे आपण कधीकधी चांगले पदार्थ फेकून देतो, तर कधीकधी खराब झालेले पदार्थ वापरून स्वतःचं आरोग्य धोक्यात घालतो. विशेषतः औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि खाद्यपदार्थांच्या बाबतीत हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या विशेष लेखात आपण या दोन्हीमधील तांत्रिक फरक सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
महिन्याचा किराणा असो किंवा घाईघाईत दुकानातून आणलेलं बिस्किटाचं पाकीट, आपण वस्तू उचलतो आणि थेट ट्रॉलीमध्ये टाकतो. घरी आल्यावर कधीतरी आपली नजर त्या पाकिटावरच्या बारीक अक्षरांकडे जाते, जिथे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट लिहिलेली असते. पण तुम्ही कधी दोन वेगवेगळ्या संज्ञांकडे लक्ष दिलंय का? काही उत्पादनांवर Expiry Date असते, तर काहींवर Best Before असं लिहिलेलं असतं.
advertisement
बऱ्याचदा आपण या दोन्ही गोष्टींना एकच समजतो आणि गोंधळात पडतो. अरे, याची तारीख तर कालच संपली, आता हे फेकून द्यायचं का? असा प्रश्न आपल्याला पडतो. अर्धवट माहितीमुळे आपण कधीकधी चांगले पदार्थ फेकून देतो, तर कधीकधी खराब झालेले पदार्थ वापरून स्वतःचं आरोग्य धोक्यात घालतो. विशेषतः औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि खाद्यपदार्थांच्या बाबतीत हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या विशेष लेखात आपण या दोन्हीमधील तांत्रिक फरक सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
advertisement
एक्सपायरी डेट म्हणजे काय?'एक्सपायरी डेट' हा एक स्पष्ट इशारा असतो की, या तारखेनंतर संबंधित उत्पादन वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ही तारीख संपल्यानंतर उत्पादनामध्ये बॅक्टेरिया किंवा इतर हानिकारक घटक तयार होऊ शकतात. ही तारीख प्रामुख्याने औषधे, सप्लिमेंट्स आणि काही ठराविक खाद्यपदार्थांवर असते. औषधांच्या बाबतीत तर एक्सपायरी डेटनंतर त्यांचं रासायनिक स्वरूप बदलू शकतं, जे जीवावर बेतू शकतं.जर तुम्ही एक्सपायरी संपलेला आयलाइनर किंवा फाउंडेशन वापरलात, तर त्वचेवर रॅशेस किंवा ॲलर्जी होऊ शकते. तसेच दुधासारख्या पदार्थांच्या बाबतीत ही तारीख उलटली की पोट बिघडण्याचे प्रकार घडतात.
advertisement
बेस्ट बिफोर (Best Before) म्हणजे नक्की काय?'बेस्ट बिफोर' चा अर्थ असा नाही की ती तारीख संपल्यावर उत्पादन लगेच खराब होईल. याचा संबंध सुरक्षिततेपेक्षा गुणवत्तेशी (Quality) जास्त असतो. या तारखेपर्यंत त्या उत्पादनाची चव, सुगंध आणि पोत (Texture) सर्वोत्तम स्थितीत असेल, याची खात्री कंपनी देते.उदाहरण: समजा एखाद्या चॉकलेट बारवर 'Best Before' तारीख आहे. ती तारीख उलटून गेल्यावरही तुम्ही ते चॉकलेट खाऊ शकता, पण कदाचित त्याची मूळ चव थोडी बदललेली असेल किंवा ते आधीसारखं कुरकुरीत लागणार नाही.महत्त्वाची टीप: जरी बेस्ट बिफोरनंतर पदार्थ खाण्यायोग्य असला, तरी तो खाण्यापूर्वी त्याचा वास किंवा रंग बदलला आहे का, हे नक्की तपासावे.
advertisement
advertisement
advertisement









