Fridge Cleaning : फ्रिजचा रबर काळा पडलाय? टेन्शन NOT, 'या' 3 घरगुती उपायांनी मिनिटांत करा चकाचक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा फ्रीज बाहेरून चकचकीत दिसतो, पण जेव्हा आपण त्याचा दरवाजा उघडतो, तेव्हा बाजूच्या पांढऱ्या रबरवर काळे डाग, तेलकट थर आणि चिकट घाण साचलेली दिसते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हीच छोटीशी चूक तुमच्या फ्रीजचं आयुष्य कमी करू शकते.
आजच्या धावपळीच्या युगात फ्रीज (Refrigerator) हा आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. रोज बाजार करणे शक्य नसल्यामुळे आठवड्याचा भाजीपाला असो, दूध-दही असो किंवा उरलेलं अन्न, आपण सर्व काही फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीज आहे म्हणून आपलं काम सोपं झालंय हे खरं, पण कधी विचार केलाय का की, याच फ्रीजची आपण हवी तशी काळजी घेतो का?
advertisement
अनेकदा फ्रीज बाहेरून चकचकीत दिसतो, पण जेव्हा आपण त्याचा दरवाजा उघडतो, तेव्हा बाजूच्या पांढऱ्या रबरवर काळे डाग, तेलकट थर आणि चिकट घाण साचलेली दिसते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हीच छोटीशी चूक तुमच्या फ्रीजचं आयुष्य कमी करू शकते. जर तुमच्या फ्रीजचं कुलिंग (Cooling) कमी झालं असेल किंवा दरवाजा वारंवार उघडत असेल, तर त्याचं मुख्य कारण हे अस्वच्छ रबर असू शकतं. आज आपण जाणून घेऊया की, कोणत्याही महागड्या केमिकलशिवाय, घरच्या घरी हे रबर कसं साफ करायचं.
advertisement
फ्रीजच्या दरवाजाला जी रबरची पट्टी असते, तिला तांत्रिक भाषेत गॅस्केट म्हणतात. याचं काम फ्रीजमधील थंड हवा बाहेर जाऊ न देणं हे असतं. पण त्यावर घाण साचली की रबरची पकड ढिली होते आणि फ्रीज व्यवस्थित बंद होत नाही. थंड हवा बाहेर गेल्यामुळे फ्रीजला जास्त काम करावं लागतं, परिणामी लाईट बिल वाढतं. साचलेली बुरशी आणि घाण तुमच्या अन्नावाटे शरीरात जाऊन आरोग्याला धोका निर्माण करू शकते.
advertisement
advertisement
1. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस (Baking Soda & Lemon)दोन मोठे चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात गरजेनुसार लिंबाचा रस मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट रबरच्या पट्टीवर सर्व बाजूंनी लावा आणि 5 ते 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासून ओल्या कपड्याने पुसून टाका. काळे डाग क्षणार्धात गायब होतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








