कुलरची गार हवा तुमच्या जीवावर बेतू शकते! अशी चूक करू नका!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
वाढत्या वापराबरोबरच कुलरशी संबंधित अपघातांचाही धोकाही वाढत जातो. विशेषतः करंट लागण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी काही मूलभूत सुरक्षितता उपायांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते.
बीड : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना घराघरात कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, वाढत्या वापराबरोबरच कुलरशी संबंधित अपघातांचाही धोकाही वाढत जातो. विशेषतः करंट लागण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी काही मूलभूत सुरक्षितता उपायांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. याबद्दलचं बीड जिल्ह्यातील वायरमन आणि फिटर अरुण चव्हाण यांनी माहिती दिली आहे.
कुलर सुरक्षित वापरासाठी सर्वप्रथम योग्य अर्थिंग असणे अत्यंत गरजेचे आहे. अर्थिंग व्यवस्थित नसेल तर विद्युत प्रवाह बाहेर येऊन गंभीर अपघात होऊ शकतो. याशिवाय कुलरचा प्लग, सॉकेट आणि वायरिंग उत्तम दर्जाचे आणि सुरक्षित असावे. कुठेही वायर कापलेली, सैल जोड किंवा स्पार्किंग होत असल्यास त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ओल्या हातांनी कुलर चालू किंवा बंद करणे टाळावे, कारण पाणी आणि वीज यांचा संपर्क धोकादायक ठरू शकतो, असं अरुण चव्हाण सांगतात.
advertisement
तसेच पुढे सांगतात की, कुलर नेहमी कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा, जिथे पाणी साचणार नाही. मोटर, पंप आणि इतर विद्युत भागांची नियमित तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोणतीही खराबी आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न न करता तज्ञांकडूनच काम करून घ्यावे.
याशिवाय कुलरमध्ये पाणी भरताना किंवा साफसफाई करताना मुख्य स्विच बंद ठेवणे आवश्यक आहे. कुलरच्या लोखंडी बॉडीवर करंट येऊ नये यासाठी योग्य इन्सुलेशन आणि अर्थिंग वायर नीट जोडलेली असावी. शक्य असल्यास MCB किंवा ELCB बसवणे फायदेशीर ठरते, कारण करंट लीकेज झाल्यास वीज पुरवठा त्वरित बंद होतो.
advertisement
कुलरमध्ये गंज किंवा ओलसरपणा टाळण्यासाठी नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. लहान मुलांनी कुलरजवळ अनावश्यक छेडछाड करू नये याचीही पालकांनी काळजी घ्यावी. या सोप्या उपायांचे पालन केल्यास उन्हाळ्यात कुलरचा सुरक्षित वापर करता येतो आणि संभाव्य अपघातांपासून बचाव होऊ शकतो, असंही अरुण चव्हाण सांगतात.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 4:41 PM IST





