advertisement

Anti roach : झुरळांना घराबाहेर घालवण्यासाठी वापरुन पाहा हे उपाय, झुरळं जातील पळून

Last Updated:

स्वयंपाकघर आणि घर कितीही स्वच्छ असलं तरी झुरळ होतात. झुरळं आरोग्यासाठीही धोकादायक असतात. झुरळांना घालवण्यासाठी, महागडी कीटकनाशकं वापरायची नसतील, तर तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. 

News18
News18
मुंबई : झुरळ घरात दिसलं की किळस येते. तुमच्याही घरात झुरळांचा त्रास होत असेल तर इथे दिलेल्या टिप्स नक्की वापरुन पाहा.
स्वयंपाकघर आणि घर कितीही स्वच्छ असलं तरी झुरळ होतात. झुरळं आरोग्यासाठीही धोकादायक असतात. झुरळांना घालवण्यासाठी, महागडी कीटकनाशकं वापरायची नसतील, तर तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.
झुरळांमुळे आजारही पसरतात. झुरळं गटारांमधून आणि कचऱ्यातून तुमच्या अन्नापर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्यामुळे अतिसार, अन्न विषबाधा आणि दमा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं.
advertisement
बेकिंग सोडा आणि साखर - झुरळांना गोड पदार्थ आवडतात, पण बेकिंग सोडा त्यांच्या पचनसंस्थेत अडथळा आणतो. त्यांना दूर पळवण्यासाठी या दोन्ही घटकांचा वापर करू शकता. बेकिंग सोडा आणि पिठीसाखर समान प्रमाणात मिसळा. ज्या ठिकाणी झुरळं नेहमी येतात म्हणजे बहुतेकदा, सिंकखाली किंवा कॅबिनेटच्या मागे, त्या ठिकाणी हे मिश्रण शिंपडा. साखरेच्या वासामुळे ती आकर्षित होतील आणि त्यातला सोडा खाल्ला की झुरळं पळून जातील.
advertisement
तेजपत्ता - झुरळांना तीव्र वास आवडत नाही. त्यामुळे मूठभर तेजपत्ता घेऊन त्याची पूड करा. आता ही पूड झुरळं ज्या ठिकाणाहून येतात त्या ठिकाणी शिंपडा. त्याच्या वासामुळे ती दूर राहतील.
कडुनिंबाचं तेल किंवा पावडर - कडुनिंब जिवाणूनाशक गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. झुरळांना दूर ठेवण्यासाठी देखील कडुनिंब खूप प्रभावी आहे. झोपण्यापूर्वी, ज्या ठिकाणी झुरळं दिसतात त्या ठिकाणी कडुनिंबाचं तेल फवारा. कडुनिंबाच्या पाण्यानं फरशीही पुसून घेऊ शकता.
advertisement
लवंग - लवंगेचा वास झुरळांना आवडत नाही. स्वयंपाकघरातील ड्रॉवर आणि कोपऱ्यांमधे 8-10 लवंगा ठेवा. ही एक सुरक्षित आणि सुगंधी पद्धत आहे.
advertisement
झुरळांटा प्रतिबंध करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची ?
स्वयंपाकघर कोरडं ठेवा - झुरळं अनेकदा पाण्याच्या शोधात येतात. रात्रीच्या वेळी सिंक आणि पाईपजवळ पाणी साचू देऊ नका.
कचऱ्याचे डबे झाकून ठेवा - उघडा कचरा झुरळांसाठी मेजवानी असतो. नेहमी झाकण असलेली कचरापेटी वापरा.
भिंतीतील भेगा भरा - भिंतीला किंवा फरशांमध्ये भेगा असतील, तर त्या त्वरित दुरुस्त करून घ्या. झुरळांसाठी ही लपण्याची जागा असते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Anti roach : झुरळांना घराबाहेर घालवण्यासाठी वापरुन पाहा हे उपाय, झुरळं जातील पळून
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement