advertisement

Anxiety : टेक्स्टिंग एन्गझायटी म्हणजे काय ? तुम्हालाही हा त्रास होतो का ? यावर उपचार कसे करायचे ?

Last Updated:

मेसेज पाठवताना किंवा पाठवल्यानंतर प्रतिसादाची वाट पाहताना आपल्याला जी अस्वस्थता किंवा तणाव जाणवतो, त्याला मेसेज एन्गायझंटी म्हणतात. आपण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा आवाजातील सूर पाहू किंवा ऐकू शकत नसल्यामुळे, आपलं मन अनेकदा नकारात्मक निष्कर्ष काढू लागतं.

News18
News18
मुंबई : मिनिटही कमी पडेल इतक्या वेगानं चालणारी सध्याची दुनिया आहे. सध्याच्या युगात मेसेजिंग हे संवादाचं सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे एखाद्याला मेसेज केला की तो काही सेकंदात पोहचतो. पण मेसेजला उत्तर आलं नाही तर तुम्ही अस्वस्थ होत असाल तर ही माहिती नक्की वाचा.
इंटरनेटचा प्रचंड वापर होतो आणि त्याचे उपयोगही आहेत पण त्यामागे एक वास्तवही दडलंय. हे अगदी कोणासोबतही घडू शकतं. तुमच्यासोबत असं कधी घडलंय का की, कोणालातरी मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही तुमचा फोन पुन्हा पुन्हा तपासता, उत्तर येईपर्यंत अधीर होता किंवा कोणाकडून मेसेज आल्यावर तो उघडायला घाबरता आणि तासन्तास उत्तर देऊ शकत नाही?
advertisement
असं असेल, तर हा टेक्स्टिंग ॲन्झायटीचा त्रास असू शकेल. हा मानसिक आजार नसून, एक मनोवैज्ञानिक स्थिती आहे जी आपल्या मनःशांतीवर परिणाम करते. ही स्थिती मनावर कसा परिणाम करते आणि तिचा सामना कसा करायचा हे जाणून घेऊया.
advertisement
मेसेज पाठवताना किंवा पाठवल्यानंतर प्रतिसादाची वाट पाहताना आपल्याला जी अस्वस्थता किंवा तणाव जाणवतो, त्याला मेसेज एन्गायझंटी म्हणतात. आपण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा आवाजातील सूर पाहू किंवा ऐकू शकत नसल्यामुळे, आपलं मन अनेकदा नकारात्मक निष्कर्ष काढू लागतं.
लहान संदेशावर जास्त विचार करणं आणि तो पाठवण्यापूर्वी दहा वेळा वाचणं, किंवा संदेश पाठवून नंतर तो डिलीट करणं. समोरच्या व्यक्तीनं संदेश वाचला आहे का पण प्रतिसाद दिला नाही हे तपासणं आणि मग, माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं का? असा विचार करणं; किंवा नकळतपणे सॉरी म्हणणं; फोनची नोटिफिकेशन वाजल्यावर अस्वस्थ वाटणं; किंवा उत्तराला उशीर झाल्यामुळे घाबरून जाणं, ही मेसेज एन्गायझंटीची ठळक लक्षणं आहेत.
advertisement
टेक्स्टिंग एन्गायझंटी टाळण्यासाठी काय करायचं ?
रीड रिसिप्ट्स बंद करा - निळ्या टिकमुळे हृदयाची धडधड वाढत असेल, तर सेटिंग्जमध्ये जाऊन त्या बंद करा. मेसेज कधी वाचला गेला हे पाहता न आल्यानं, त्याला उत्तर का दिलं नाही या विचारांच्या चक्रातून बाहेर पडायला मदत होईल.
मर्यादा निश्चित करा - अनावश्यक मेसेजला उत्तर न देणं किंवा रात्री किती वाजेपर्यंत उत्तर द्यायचं याची मर्यादा निश्चित करा.
advertisement
आवाजाच्या सुरावरून अंदाज लावू नका - मेसेजमधून भावना व्यक्त होत नाहीत. कोणीतरी 'ओके' किंवा 'के' म्हटल्यानं ते नाराज आहेत असं होत नाही. ते कदाचित व्यस्त असतील. शब्दांमागे दडलेलं अर्थ शोधणं थांबवा.
थेट फोन करणं अधिक चांगलं - विषय गंभीर असेल किंवा मेसेजवर गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर टाईप करणं थांबवा आणि फोन करा. गैरसमजांना कारणीभूत ठरू शकणाऱ्या पन्नास मेसेजपेक्षा पाच मिनिटांचं संभाषण अधिक चांगलं.
advertisement
उत्तरांमुळे तुमचं मूल्य कमी जास्त होत नाही – उत्तर न मिळणं किंवा वेळेवर न मिळणं हे तुमच्या क्षमतेचं किंवा तुम्ही किती महत्त्वाचे आहात याचं द्योतक नाही हे लक्षात ठेवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Anxiety : टेक्स्टिंग एन्गझायटी म्हणजे काय ? तुम्हालाही हा त्रास होतो का ? यावर उपचार कसे करायचे ?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement