advertisement

Skin Care : चेहऱ्यावरचे मुरुम फोडताय ? आधी ही माहिती वाचा, सवय ठरु शकते त्वचेसाठी घातक

Last Updated:

चेहऱ्यावर कधी मुरुम आला, तर तो फोडण्याची कितीही इच्छा झाली तरी, तो फोडण्याची चूक करू नका. मुरुम फोडण्याची सवय त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते.

News18
News18
मुंबई : चेहऱ्यावर मुरुम आले की काही दिवसांनी जातात पण काहीजण चेहऱ्यावरचा मुरूम फोडतात. पण मुरूम फोडणं त्वचेसाठी चांगलं नाही. तज्ज्ञांच्या मते, मुरूम फोडल्यानं व्रण पडू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.
चेहऱ्यावर कधी मुरुम आला, तर तो फोडण्याची कितीही इच्छा झाली तरी, तो फोडण्याची चूक करू नका. मुरुम फोडण्याची सवय त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
संसर्गाचा धोका वाढतो - मुरुम फोडल्यामुळे त्वचेवर जखम होते. आपल्या हातांवर आणि नखांवर असंख्य जीवाणू असतात. एकदा का मुरुम फुटला की, हे जीवाणू त्या उघड्या छिद्रातून त्वचेत प्रवेश करू शकतात. यामुळे मुरुमाच्या जागी संसर्ग होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे अधिक वेदना आणि पू होऊ शकतो.
advertisement
त्वचेची जळजळ आणि दाह - त्वचा खूप संवेदनशील असते, तर आपली नखं तिच्यापेक्षा खूपच मजबूत आणि कणखर असतात. मुरुम काढण्यासाठी नखांनी त्वचेवर जोरदार दाब दिला तर आजूबाजूच्या पेशींना इजा पोहोचते. यामुळे जळजळ आणि तीव्र दाह होऊ शकतो.
advertisement
लोक अनेकदा मुरुम काढण्याची साधनं वापरतात, पण वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर केला तर त्वचा सोलली जाऊ शकते. त्यामुळे, ही साधनं कधीही स्वतःहून वापरू नका.
advertisement
त्वचेवरील व्रण - मुरुम दाबण्याचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे व्रण. मुरुम दाबण्यासाठी जास्त दाब दिला तर रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्वचेच्या खोलवरच्या ऊतींचं नुकसान होऊ शकतं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक मुरुम त्वचेच्या पृष्ठभागावर नसून खोलवर असतात. त्यांना दाबल्यामुळे ते बाहेर येण्याऐवजी आतच राहू शकतात, ज्यामुळे त्वचेचं नुकसान होतं आणि पुढे त्याचे खोल खड्डे किंवा काळे डाग बनू शकतात.
advertisement
मुरुम फोडणं त्या क्षणी योग्य वाटू शकतं, पण त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतात. त्यामुळे, मुरुमांची समस्या गंभीर असेल, तर स्वतःहून त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यावरचे मुरुम फोडताय ? आधी ही माहिती वाचा, सवय ठरु शकते त्वचेसाठी घातक
Next Article
Rohit Sharma VIDEO :  4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
View All
advertisement