advertisement

Summer Drink : ऐन उन्हाळ्यात सरबताचा थंडावा, पान सरबत - पान गुलकंद सरबत देईल थंडगार दिलासा

Last Updated:

उन्हाळ्यात, थंड पेयं पिण्याऐवजी, घरी सरबत पिणं हा एक चांगला पर्याय आहे. कैरीचं पन्हं, कोकम सरबत यासोबतच घरी पान सरबत करुन पाहता येईल. हा घरगुती पर्याय आरोग्यासाठी उपयोगी आणि चविष्ट आहे.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्याचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. प्रत्येकालाच काहीतरी थंड आणि हटके खाण्याची इच्छा होते.
उन्हाळ्यात, थंड पेयं पिण्याऐवजी, घरी सरबत पिणं हा एक चांगला पर्याय आहे. कैरीचं पन्हं, कोकम सरबत यासोबतच घरी पान सरबत करुन पाहता येईल. हा घरगुती पर्याय आरोग्यासाठी उपयोगी आणि चविष्ट आहे.
जेवण झाल्यावर पान खात असाल तर याच पानाचा आणखी एक उपयोग करता येईल. पानाचे नैसर्गिक गुणधर्म थंडावा देणारे असतात आणि गुलकंदाचा गोडवा यातून एक मस्त पेय तयार करता येईल.
advertisement
उन्हाळ्यासाठी खास पान सरबत आणि पान गुलकंद सरबत घरीच सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं शिकूया.
पान सरबतासाठी, ताजी गोड विड्याची सहा-सात पानं, साखर किंवा मध – दोन मोठे चमचे चवीनुसार,
एक कप थंड दूध किंवा पाणी, एक छोटा चमचा बडीशेप, वेलची – चार-पाच दाणे, सहा-सात बर्फाचे तुकडे असं साहित्य लागेल.
advertisement
पान सरबत बनवण्यासाठी, प्रथम विड्याची पानं धुवून चिरुन घ्या. मिक्सरमधे चिरलेली विड्याची पानं, बडीशेप, वेलची आणि साखर घालून, थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. नंतर, या पेस्टमधे उरलेले थंड दूध किंवा पाणी घालून चांगलं मिसळा. तयार सरबत एका ग्लासात गाळून घ्या. त्यावर बर्फाचे तुकडे घालून लगेच सर्व्ह करा. चव वाढवण्यासाठी गुलाबपाण्याचे काही थेंब देखील घालू शकता.
advertisement
पान गुलकंद शरबत रेसिपीसाठी पाच - सहा विड्याची पानं, गुलकंद – दोन मोठे चमचे, थंड दूध किंवा पाणी – एक कप, दूध (ऐच्छिक) – एक छोटा चमचा, सहा-सात बर्फाचे तुकडे असं साहित्य लागेल.
advertisement
पान गुलकंद सरबत बनवण्यासाठी, प्रथम विड्याची पानं धुवून त्याचे लहान तुकडे करा. विड्याच्या पानांचे तुकडे आणि गुलकंद मिक्सरमधे घालून बारीक पेस्ट बनवा. या मिश्रणात थंड दूध किंवा पाणी घालून चांगलं एकजीव करा.
तुम्हाला हवं असेल तर, थोडं कंडेन्स्ड मिल्क घालून ते अधिक घट्ट करू शकता. एका ग्लासमधे ओता, बर्फाचे तुकडे घाला आणि थंडगार सर्व्ह करा. सर्व्ह करताना, त्यावर कापलेला सुका मेवा किंवा गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा; यामुळे चव आणि सौंदर्य दोन्ही वाढेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Drink : ऐन उन्हाळ्यात सरबताचा थंडावा, पान सरबत - पान गुलकंद सरबत देईल थंडगार दिलासा
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement