NMIA News: नवी मुंबई ते कोल्हापूर, संभाजीनगर आता तासाभरात; विमानतळावरून २८ शहरांची कनेक्टिव्हिटी, तुमचं शहर यादीत आहे का?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या वेळापत्रकातून देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणार आहे.
नवी मुंबई: मुंबई विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी डिसेंबर 2025 मध्ये नवी मुंबईमध्ये आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात आली. दिवसेंदिवस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची संख्या वाढवताना दिसत आहे. सध्या तरी या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा चालवली जात आहे. अद्याप तरीही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यात आलेली नाही. आता अशातच प्रवाशांसाठी विमान संख्या वाढवली जात आहे. पहिल्यांदाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उन्हाळी वेळापत्रक लागू होणार आहे. नेमकं कशा पद्धतीने वेळापत्रकात बदल होतोय, जाणून घेऊया...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Navi Mumbai International Airport- NMIA) पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जे 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीत लागू केले जाणार आहे. या विमानतळावरील फेऱ्यांमध्ये आता 16 वरून 46 ठिकाणापर्यंत सेवा विस्तारल्या जात आहेत. म्हणजेच आठवड्याला 1092 वेळा विमान अवकाशात झेपावणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेळापत्रकामुळे 30 नवीन देशांतर्गत मार्ग सुरू होणार आहेत. जे विमानतळाला भारतातील व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रांशी जोडले जाईल. दिल्लीहून दररोज सर्वाधिक नऊ फेऱ्या होतील, त्यानंतर गोव्यासाठी सात आणि बंगळूरुसाठी सहा फेऱ्या असतील. याव्यतिरिक्त, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदोर या पर्यटन स्थळी सुद्धा विमानाच्या फेऱ्या असतील.
advertisement
या कालावधीत विमानतळावरून इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांचे विमान उड्डाण करणार आहे. विमान सेवेमध्ये वाढ झाल्यानंतर दिवसाला 156 विमान उड्डाणे होणार असून 1092 उड्डाणे आठवड्याला होणार आहेत. मार्च 2026 पर्यंत विमानतळावरून दररोज 22 विमान उड्डाण करत होते. पण आता एप्रिल 2026 पासून यामघ्ये आणखीन 78 फेऱ्या वाढवल्या जात आहेत. याचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विस्तारामुळे टियर-1 आणि टियर-2 शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाढत्या प्रवासी मागणीला आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
आग्रा, छत्रपती संभाजीनगर, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दीव- दमन, दुर्गापूर, गोवा (दाबोलीम), गोरखपूर, हिंडन, हिरासर (राजकोट), हुबळी, जबलपूर, जम्मू- काश्मीर, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर. तिरुपती, त्रिवेंद्रम आणि विझाग या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाणे घेणार आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
NMIA News: नवी मुंबई ते कोल्हापूर, संभाजीनगर आता तासाभरात; विमानतळावरून २८ शहरांची कनेक्टिव्हिटी, तुमचं शहर यादीत आहे का?






