advertisement

ट्रेनचं मायलेज किती असतं माहितेय? 1 लिटर डिझेलमध्ये किती अंतर पार करते इंजिन; पाहा रेल्वेचं थक्क करणारं गणित

Last Updated:
एका इंजिनला मागे खेचण्यासाठी 10 ते 20 डबे असतात आणि त्यात हजारो प्रवासी. अशा परिस्थितीत हे इंजिन 1 लिटर डिझेलमध्ये किती अंतर कापत असेल? चला, रेल्वेच्या या डिझेल गणिताबद्दल जाणून घेऊ.
1/9
आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती नवी गाडी किंवा बाईक खरेदी करायला जाते, तेव्हा लोकांकडून विचारला जाणारा सर्वात पहिला प्रश्न असतो तो म्हणजे ही गाडी मायलेज किती देते? किंवा Average काय आहे?. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना, 1 लिटर इंधनात आपली गाडी किती किलोमीटर धावेल, यावरच आपल्या खिशाचं गणित अवलंबून असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, ज्या ट्रेनने लाखो लोक दररोज प्रवास करतात, त्या रेल्वे इंजिनचं मायलेज किती असेल?

2/9
एका इंजिनला मागे खेचण्यासाठी 10 ते 20 डबे असतात आणि त्यात हजारो प्रवासी. अशा परिस्थितीत हे इंजिन 1 लिटर डिझेलमध्ये किती अंतर कापत असेल? चला, रेल्वेच्या या डिझेल गणिताबद्दल जाणून घेऊ.
एका इंजिनला मागे खेचण्यासाठी 10 ते 20 डबे असतात आणि त्यात हजारो प्रवासी. अशा परिस्थितीत हे इंजिन 1 लिटर डिझेलमध्ये किती अंतर कापत असेल? चला, रेल्वेच्या या डिझेल गणिताबद्दल जाणून घेऊ.
advertisement
3/9
प्रत्येक ट्रेनचं मायलेज सारखं नसतंगाड्यांप्रमाणेच सर्व ट्रेनचं मायलेज सारखं नसतं. ते ट्रेनच्या प्रकारावर, डब्यांच्या संख्येवर आणि ती किती वजन वाहून नेत आहे, यावर अवलंबून असतं. तसेच, रेल्वे कोणत्या रूटवर धावतेय आणि तिथे ट्रॅफिक सिग्नल किती आहे, याचाही परिणाम मायलेजवर होतो. साध्या शब्दात सांगायचं तर, 12 डबे असलेल्या पॅसेंजर ट्रेनला 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे 6 लिटर डिझेल लागतं. तर दुसरीकडे, 12 डबे असलेल्या एक्सप्रेस ट्रेनला 1 किलोमीटरसाठी 4.5 लिटर डिझेल लागतं.
प्रत्येक ट्रेनचं मायलेज सारखं नसतं गाड्यांप्रमाणेच सर्व ट्रेनचं मायलेज सारखं नसतं. ते ट्रेनच्या प्रकारावर, डब्यांच्या संख्येवर आणि ती किती वजन वाहून नेत आहे, यावर अवलंबून असतं. तसेच, रेल्वे कोणत्या रूटवर धावतेय आणि तिथे ट्रॅफिक सिग्नल किती आहे, याचाही परिणाम मायलेजवर होतो. साध्या शब्दात सांगायचं तर, 12 डबे असलेल्या पॅसेंजर ट्रेनला 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे 6 लिटर डिझेल लागतं. तर दुसरीकडे, 12 डबे असलेल्या एक्सप्रेस ट्रेनला 1 किलोमीटरसाठी 4.5 लिटर डिझेल लागतं.
advertisement
4/9
1 लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती धावेल?आता या गणिताला थोडं उलटं करून पाहूया. जर इंजिनमध्ये फक्त 1 लिटर डिझेल भरलं, तर ट्रेन किती पुढे जाईल?
पॅसेंजर ट्रेन: 12 डबे असलेली पॅसेंजर ट्रेन 1 लिटर डिझेलमध्ये साधारणपणे 180 ते 200 मीटर अंतर कापते.
1 लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती धावेल? आता या गणिताला थोडं उलटं करून पाहूया. जर इंजिनमध्ये फक्त 1 लिटर डिझेल भरलं, तर ट्रेन किती पुढे जाईल? पॅसेंजर ट्रेन: 12 डबे असलेली पॅसेंजर ट्रेन 1 लिटर डिझेलमध्ये साधारणपणे 180 ते 200 मीटर अंतर कापते.
advertisement
5/9
तर सुपरफास्ट ट्रेन: सुपरफास्ट ट्रेनचं इंजिन 1 लिटर डिझेलमध्ये सुमारे 230 मीटर पर्यंतचा प्रवास करू शकतं.म्हणजेच 1 किलोमीटर पूर्ण करण्यासाठी इंजिनला अनेक लिटर डिझेल लागतं. यावरुन तुम्ही अंदाजा लावू शकता की हजारो किलोमीटर धावणाऱ्या ट्रेनचा इंधन खर्च किती येत असेल.

6/9
एक्सप्रेसचं मायलेज पॅसेंजरपेक्षा जास्त का?तुम्हाला वाटेल की पॅसेंजर ट्रेन हळू चालते, मग तिचं मायलेज जास्त असायला हवं. पण वास्तव उलट आहे.
पॅसेंजर ट्रेन: या ट्रेनला प्रत्येक छोट्या स्टेशनवर थांबावं लागतं. वारंवार ब्रेक लावणं आणि पुन्हा वेग पकडण्यासाठी एक्सिलेटर देणं, यात इंधन जास्त जळतं. त्यामुळे पॅसेंजरचं मायलेज कमी असतं.
एक्सप्रेसचं मायलेज पॅसेंजरपेक्षा जास्त का? तुम्हाला वाटेल की पॅसेंजर ट्रेन हळू चालते, मग तिचं मायलेज जास्त असायला हवं. पण वास्तव उलट आहे. पॅसेंजर ट्रेन: या ट्रेनला प्रत्येक छोट्या स्टेशनवर थांबावं लागतं. वारंवार ब्रेक लावणं आणि पुन्हा वेग पकडण्यासाठी एक्सिलेटर देणं, यात इंधन जास्त जळतं. त्यामुळे पॅसेंजरचं मायलेज कमी असतं.
advertisement
7/9
सुपरफास्ट/एक्सप्रेस: या गाड्यांचे थांबे कमी असतात आणि त्या एका ठराविक वेगात बराच वेळ धावतात. सतत ब्रेक न लावल्यामुळे या इंजिनचं मायलेज पॅसेंजरच्या तुलनेत चांगलं असतं.
सुपरफास्ट/एक्सप्रेस: या गाड्यांचे थांबे कमी असतात आणि त्या एका ठराविक वेगात बराच वेळ धावतात. सतत ब्रेक न लावल्यामुळे या इंजिनचं मायलेज पॅसेंजरच्या तुलनेत चांगलं असतं.
advertisement
8/9
वजनाचा मोठा परिणामट्रेनमध्ये जितकी गर्दी जास्त आणि डबे जास्त, तितका इंजिनवर ताण वाढतो. मालगाड्यांच्या बाबतीत तर हे मायलेज अजूनच कमी होतं, कारण तिथे वजनाचं प्रमाण प्रचंड असतं.
वजनाचा मोठा परिणामट्रेनमध्ये जितकी गर्दी जास्त आणि डबे जास्त, तितका इंजिनवर ताण वाढतो. मालगाड्यांच्या बाबतीत तर हे मायलेज अजूनच कमी होतं, कारण तिथे वजनाचं प्रमाण प्रचंड असतं.
advertisement
9/9
रेल्वेचं मायलेज ऐकल्यावर आता तुम्हाला तुमच्या बाईक किंवा कारचं मायलेज खूपच भारी वाटू लागेल. पण हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहोचवणाऱ्या या 'लोहपथगामिनी'साठी हे इंधन म्हणजे तिच्या अफाट शक्तीचं गुपित आहे. पुढच्या वेळी ट्रेनने प्रवास करताना इंजिनचा तो आवाज ऐकला की, हे मायलेजचं गणित नक्की आठवा.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement