अमिताभ बच्चनसोबत डेब्यू, व्हिलन बनून दाखवली झलक; हिरो बनताच अभिनेत्यानं हलवलं बॉक्स ऑफिस
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हा फेमस अभिनेता कोण जो ज्यानं अमिताभ बच्चनबरोबर डेब्यू केला. आधी व्हिलन म्हणून झळकला आणि त्यानंतर हिरो झाला. हिरो होताच त्याने बॉक्स ऑफिस हलवून टाकलं होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
70 च्या दशकाच्या सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांनी खलनायक म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्यापुढे मोठे अभिनेतेही फिके पडले. नायकापेक्षा खलनायकाची वाट प्रेक्षक पाहायचे. 'मेरे अपने'मधील 'छेनू'ची भूमिका असो किंवा 'रामपूर का लक्ष्मण'मधील खलनायकाची भूमिका असो शत्रुघ्न यांनी हे सिद्ध केले की खलनायक केवळ लोकांना घाबरवण्यासाठी नसतो, तर तो प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठीही असतो.
advertisement
बॉलिवूडमध्ये लोकांना खलनायकाला नायक म्हणून पाहणे दुर्मिळ आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी हा गैरसमज मोडून काढला. जेव्हा सुभाष घई यांनी 1976 मध्ये 'कालीचरण' हा आपला पहिला चित्रपट बनवला. तेव्हा त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना कास्ट केले. हा एक मोठा धोका होता, कारण एका प्रसिद्ध खलनायकाला लोक नायक म्हणून स्वीकारतील की नाही याची खात्री नव्हती. 'कालीचरण' प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर इतका प्रचंड यशस्वी ठरला की सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि शत्रुघ्न सिन्हा रातोरात सुपरस्टार बनले.
advertisement
यानंतर 'विश्वनाथ', 'गौतम गोविंदा' आणि 'दोस्ताना' यांसारख्या चित्रपटांमधून शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. एके काळी त्यांना अमिताभ बच्चन यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानलं जात होतं. अमिताभ आणि शत्रुघ्न यांनी 'बॉम्बे टू गोवा', 'परवाना', 'काला पत्थर', 'शान' आणि 'दोस्ताना' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.
advertisement
आपल्या 'एनीथिंग बट खामोश' या आत्मचरित्रात शत्रुघ्न सिन्हा यांनी हेदेखील सांगितलं आहे की, अमिताभ यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एकदा त्यांच्यात आणि अमिताभ यांच्यात तणाव निर्माण झाला होता. हा तो काळ होता जेव्हा चित्रपटाच्या पोस्टरवर कोणाचं नाव आधी येईल आणि कोणाचा संवाद सर्वात प्रभावी असेल यावरून जोरदार वादविवाद व्हायचे.






