VIDEO : व्हिआयपी सूटमध्ये आगीचा भडका, प्रसंगावधान दाखवत खासदारांनी वाचवला सगळ्यांचा जीव, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ही घटना ज्यावेळेस घडली तेव्हा खासदार स्वता: त्या व्हीआयपी सूटमध्ये उपस्थित होते.त्यामुळे त्यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली आणि मोठी जिवितहानी आणि आर्थिकहानी टाळली आहे.
Bhandara News : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भंडाऱ्यातील शासकीय विश्रामगृह (व्हीआयपी सूटमध्ये)आगीचा भडका उडाल्याची घटना घडली आहे. ही घटना ज्यावेळेस घडली तेव्हा खासदार स्वता: त्या व्हीआयपी सूटमध्ये उपस्थित होते.त्यामुळे त्यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली आणि मोठी जिवितहानी आणि आर्थिकहानी टाळली आहे.त्यामुळे या घटनेटची प्रचंड चर्चा रंगली आहे.
भंडाऱ्यातील विश्रामगृहात असलेल्या व्हीआयपी सूटमध्ये खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे बसले होते. या दरम्यान अचानक व्हीआयपी सुटच्या दरवाजाजवळ शॉर्टसर्किटची घटना घडली होती. या शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. खरं तर आग फारशी मोठी नव्हती पण व्हिआयपी सूटमध्ये धुरांचे लोण पसरले होते.अगदी धुरात समोरचा माणूसही दिसणार नाही अशी परिस्थिती होती.
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/BHANDARA-FIRE-2-2026-03-33ce1fda8b937a45376b078b8b1922ae.mp4"][/video]
advertisement
दरम्यान ही आग आणखी रोद्ररुप धारण करण्याची मोठी शक्यता होती. ही गोष्ट लक्षात येताच प्रसंगावधान राखत उपस्थित खासदार प्रशांत पडोळे व त्यांचे स्वीय सहायकांनी फायर एक्स्टिगिशरच्या माध्यमातून आग विझवण्याच्या प्रयत्न केला होता.पण आग काय विझली नव्हती. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली होती,आणि आग विझवण्यााठी घटनास्थळी धाव घेतली होती.
advertisement
आम्ही 15 मिनिटं आत बसलो आणि आम्हाला तडतड असा आवाज आला आणि वास यायला लागला. आम्ही लगेच बाहेर आलो,त्यानंतर आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला पण ती आटोक्यात आली नाही.पण या घटनेची चौकशी झाली पाहिजे.ही आग कशी लागली,मेंटेनन्स कोण बघतं,याडेही लक्ष्य देणे आवश्यक आहे. आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.कारण ही अत्यंत निंदनीय ही घटना आहे. प्रत्येक लोकप्रतिनधी येऊन इथे बसतात आणि कार्यक्रम पार पड असतात.पण चांगल झालं मी जागा होता, जर ही घटना रात्री झाली असती तर माझा मृ्त्यू झाला असता,असे प्रशांत पडोळे या घटनेवर म्हणाले आहे.
advertisement
दरम्यान सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही आहे. पण या घटनेने व्हिआयपी सूटमधील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 6:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : व्हिआयपी सूटमध्ये आगीचा भडका, प्रसंगावधान दाखवत खासदारांनी वाचवला सगळ्यांचा जीव, नेमकं काय घडलं?







