उन्हाचा पारा चढला, वाघ, सिंहासाठी कुलर अन् वॉटर फॉगर, पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील थाट PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
कात्रज येथील राजीव गांधी झूलॉजिकल पार्क येथे प्राण्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. वाढत्या तापमानामुळे प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
राज्यासह पुणे शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या झळा नागरिकांसह प्राण्यांनाही जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर कात्रज येथील राजीव गांधी झूलॉजिकल पार्क येथे प्राण्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. वाढत्या तापमानामुळे प्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
advertisement
सध्या पुण्यात तापमान वाढू लागल्याने दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवत आहे. या परिस्थितीत प्राणीसंग्रहालयातील वाघ, सिंह, हत्ती तसेच इतर अनेक प्राण्यांना थंडावा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्राण्यांना दिवसातून दोन वेळा अंघोळ घालण्याची व्यवस्था केली असून काही ठिकाणी कुलर आणि वॉटर फॉगर बसवण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
यामुळे प्राण्यांना उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होत आहे. विशेषतः मोठे प्राणी जसे की हत्ती पाण्यात खेळताना दिसत आहेत, तर वाघ आणि सिंह पाण्याच्या हौदाजवळ आराम करताना पाहायला मिळत आहेत. प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत प्राण्यांवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक प्राण्याच्या आरोग्याची तपासणी नियमित केली जात असून त्यांच्या आहारामध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. काही प्राण्यांना थंडावा देणारे फळे आणि पाण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.
advertisement







