advertisement

MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमुळे सुरूवातीला आयपीएलच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती.

MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!
MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!
मुंबई : आयपीएल 2026 च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमुळे सुरूवातीला आयपीएलच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती, पण आता निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा पहिला सामना 28 मार्चला गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
28 मार्चला सुरू होणाऱ्या आयपीएल 2026 च्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना 24 मे रोजी होणार आहे, यानंतर टॉप-4 टीम प्ले-ऑफ आणि फायनल खेळतील. प्ले-ऑफ आणि फायनलच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.

मुंबई इंडियन्सचे सामने

सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई इंडियन्स या मोसमातही एकूण 14 सामने खेळणार आहे, यातले 7 सामने मुंबई इंडियन्स त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळेल. या मोसमातला मुंबईचा पहिला सामना केकेआरविरुद्ध रविवार 29 मार्चला होईल, तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना मुंबई 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईमध्येच खेळेल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात एकही सामना पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आला नव्हता, पण दुसऱ्या टप्प्यात या दोन्ही टीम दोन वेळा भिडणार आहेत.
advertisement
सामना क्र.तारीखवारवेळहोम टीमअवे टीममैदान
129-मार्च-26रविवार7:30 PMमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्समुंबई
204-एप्रिल-26शनिवार3:30 PMदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सदिल्ली
307-एप्रिल-26मंगळवार7:30 PMराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सगुवाहाटी
412-एप्रिल-26रविवार7:30 PMमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमुंबई
516-एप्रिल-26गुरुवार7:30 PMमुंबई इंडियन्सपंजाब किंग्समुंबई
620-एप्रिल-26सोमवार7:30 PMगुजरात टायटन्समुंबई इंडियन्सअहमदाबाद
723-एप्रिल-26गुरुवार7:30 PMमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्समुंबई
829-एप्रिल-26बुधवार7:30 PMमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादमुंबई
902-मे-26शनिवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सचेन्नई
1004-मे-26सोमवार7:30 PMमुंबई इंडियन्सलखनऊ सुपर जायंट्समुंबई
1110-मे-26रविवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमुंबई इंडियन्सरायपूर
1214-मे-26गुरुवार7:30 PMपंजाब किंग्समुंबई इंडियन्सधर्मशाळा
1320-मे-26बुधवार7:30 PMकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सकोलकाता
1424-मे-26रविवार3:30 PMमुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्समुंबई
advertisement

मुंबई इंडियन्सची टीम

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, शरफेन रदरफोर्ड, रेयान रिकलटन, क्विंटन डिकॉक, दानिश मालेवार, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, राज अंगद बावा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, ट्रेन्ट बोल्ट, मयंक मार्कंडे, दीपक चहर, अश्विनी कुमार, रघू शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद इजहार, अल्लाह गझनफर
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement