Hair Care : केस गळण्यावर उपयुक्त आयुर्वेदिक उपाय, हेअर टॉनिकनं केसांची होईल चांगली वाढ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मेथी आणि रोझमेरीपासून बनवलेले हेअर टॉनिक नैसर्गिक केस वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतं. हे कोणत्याही केमिकल हेअर टॉनिकपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि याचे दुष्परिणाम कमी आहेत. हेअर टॉनिक बनवण्यासाठी, एक-दोन चमचे मेथीचे दाणे, दोन चमचे सुकलेली रोझमेरीची पानं, दोन चमचे सुकलेला आवळा, एक ग्लास पाणी, नारळाचं तेल, जवस असं साहित्य आवश्यक आहे.
मुंबई : केस गळणं, वजन कमी करणं या दोन गोष्टींवर कायम नवनवीन युक्त्या शोधल्या जात असतात. केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर विगचा वापरही करता येतो.
नवीन केस उगवण्यासाठी हेअर सीरमचा वापर काही जण करतात. केस पातळ होणं, कोरडे होणं आणि टक्कल पडणं यामुळे लोकांचा आत्मविश्वासही कमी होतो. या समस्येशी झुंजत असाल, तर केसगळती रोखण्यासाठी एक आयुर्वेदिक हेअर टॉनिक वापरुन पाहा. यामुळे केसांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी चालना मिळेल.
advertisement
मेथी आणि रोझमेरीपासून बनवलेले हेअर टॉनिक नैसर्गिक केस वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतं. हे कोणत्याही केमिकल हेअर टॉनिकपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि याचे दुष्परिणाम कमी आहेत. हेअर टॉनिक बनवण्यासाठी, एक-दोन चमचे मेथीचे दाणे, दोन चमचे सुकलेली रोझमेरीची पानं, दोन चमचे सुकलेला आवळा, एक ग्लास पाणी, नारळाचं तेल, जवस असं साहित्य आवश्यक आहे.
advertisement
सुरुवातीला, समान प्रमाणात मेथी आणि जवस घ्या. एक ग्लास पाण्यात सुका आवळा आणि दोन चमचे खोबरेल तेल घाला.
हे मिश्रण उकळायला ठेवा. पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळत रहा. ते गाळून घ्या, हे मिश्रण पेस्टसारखं दिसेल.
advertisement
पेस्ट तयार झाल्यावर, आठवड्यातून तीन वेळा केसांच्या मुळांना लावा. कापसानं टॉनिक केसांना लावा आणि काही तास तसंच राहू द्या. त्यानंतर, साध्या पाण्यानं केस स्वच्छ धुवा. काही दिवसांत याचे परिणाम दिसून येतील. हे करण्यापूर्वी, केसांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 7:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केस गळण्यावर उपयुक्त आयुर्वेदिक उपाय, हेअर टॉनिकनं केसांची होईल चांगली वाढ