advertisement

Mumbai Melody Road: 'मेलडी रोड'बद्दल नागरिकांना दिलासा, कोस्टल रोडबद्दल BMC ने काय निर्णय घेतला?

Last Updated:

मुंबई कोस्टल रोडवरील म्युझिकल रोडविरोधात स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते. त्याबद्दल आता महापालिका आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

News18
News18
मुंबई: 'कोस्टल रोड' सध्या गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत राहिला आहे. 'कोस्टल रोड'ची 'मेलडी रोड' म्हणून ओळख पटलेली आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी 'कोस्टल रोड'वर काही म्युझिकल बीट्स बनवलेल्या होत्या. ज्यामुळे रहिवाशांसह पेशंटला सुद्धा त्या आवाजाचा बराच त्रास होत होता. त्या आवाजामुळे रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. ब्रीच कँडी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहित आणि त्यावर स्वाक्षरी करत मोठ्या संख्येने म्युझिक बीट्स बंद करण्याची मागणी केली होती. अखेर नागरिकांची ती मागणी महापालिका आयुक्तांनी मान्य करत त्या जवळ बॅरिकेट्स लावलेले आहेत.
मुंबईतील कोस्टल रोडच्या उत्तरेकडील लेनवर असलेल्या म्युझिक बीट्सने, तयार केलेल्या पॅचवरून वाहने जाताना 'जय हो' हे गाणे वाजत असल्यामुळे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना फार त्रास होत होता. ब्रीच कँडीच्या परिसरातील रहिवाश्यांनी रस्त्यावरून, विशेषतः पहाटे आणि रात्री उशिरा येणाऱ्या सततच्या आवाजावर आक्षेप घेतला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पूर्वी या रोडवरील साऊंड डेसिबलची मोजणी करण्यात आली होती. पण तरीही त्याचा आता नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे रस्त्याचा हा भाग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे आम्ही तेवढ्या भागावर बॅरिकेट्स लावले आहेत. तो भाग केवळ विशेष प्रसंगी किंवा शनिवार- रविवारीच उघडला जाऊ शकतो.”
advertisement
11 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड (दक्षिण) मधील अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी या संगीत रस्त्याचे (मेलोडी रोड) उद्घाटन करण्यात आले. या रोडसाठी राज्य सरकारने 6 कोटी रुपये खर्चले होते. बोगद्यापासून सुमारे 500 मीटर पुढे असलेल्या या रस्त्यावर, वाहने ताशी 70- 80 किमी वेगाने धावतात. त्या पॅचवरून भरधाव वेगाने गाड्या गेल्यानंतर 'जय हो' गाण्याचा आवाज येतो. 'मेलडी रोड'ची संकल्पना जरीही नवीन असली तरीही परिसरातील 650 हून अधिक कुटुंबांनी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे रस्ता बंद करण्याची मागणी केलेली होती. रस्त्याचा आवाज हा एक सततचा आणि त्रासदायक असल्यामुळे आम्हाला याचा फार त्रास होतो, असं त्यांनी आयुक्तांना सांगितलेलं. रहिवाशांनी तक्रार देताना त्यांच्या समस्याही मांडल्या होत्या.
advertisement
“मेलडी रोडमुळे परिसरातील नागरिकांना फारच त्रास होत आहे. या आवाजामुळे आम्ही आमच्या खिडक्या उघड्या ठेवू शकत नाही. तो आवाज सतत ऐकू येत असल्यामुळे त्याचा आम्हाला फार त्रास होतोय.”, असे रहिवाशांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले. जपान, हंगेरी आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये मेलडी रोडचा कायमच वापर केला जातो.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Melody Road: 'मेलडी रोड'बद्दल नागरिकांना दिलासा, कोस्टल रोडबद्दल BMC ने काय निर्णय घेतला?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement