17 वर्षांनी सीक्वेल, हाय TRP! तरी 8 महिन्यांतच गाशा गुंडाळायची वेळ, TV ची फेमस मालिका Off Air?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हाय TRP असलेली लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कोणती आहे ही मालिका?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आपण बोलत आहोत, 'क्योंकी सास भी कभी बहू थी'चा दुसरा सीझनबद्दल. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. मालिकेचा घसरमारा टीआरपी आणि रेटिंगमुळे निर्माते शो बंद करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करण्यात आला होता. यानंतर चाहत्यांना नाराजी व्यक्त केली केली. या सगळ्या चर्चा खऱ्या की खोट्या असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. दरम्यान स्टार प्लस वाहिनीने पुढे येत खरं काय ते सांगितलं आहे. मालिकेबाबत त्यांनी महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
नवीन शोच्या अफवा आणि दावे गेल्या आठवड्यात डिजिटल मीडिया आणि विविध गॉसिप पोर्टल्सवर वाऱ्यासारखी पसरली होती. तुलसी विराणी यांचा वारसा पुढे नेणारा हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इतकेच नाही, तर 'क्योंकी रिश्तों के भी रूप बदलते हैं' नावाचा एक नवीन मालिका या शोची जागा घेणार अशाही चर्चा होती.
advertisement
advertisement
चॅनलने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले, "आम्ही अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्स पाहिले ज्यात असा दावा केला जात होता की 'क्योंकी सास भी कभी बहू थी' सीझन 2 संपत आहे आणि त्याच्या जागी एक नवीन शो येणार आहे. आम्ही अधिकृतपणे स्पष्ट करू इच्छितो की या रिपोर्ट्समध्ये अजिबात तथ्य नाही. शो संपवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. तसंच संपणार असल्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही."
advertisement
स्टार प्लसच्या निवेदनानंतर चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 'क्योंकी...' हा केवळ एक शो नाही, तर भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे, ज्याने सासू-सुनेच्या नात्यातील नाट्याची संकल्पनाच बदलून टाकली. सीझन 2 द्वारे, निर्मात्यांनी तीच जादू पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विराणी कुटुंबाची कथा अजून संपलेली नाही आणि प्रेक्षकांना अजूनही अनेक हाय-व्होल्टेज ड्रामा आणि रंजक वळणे पाहायला मिळतील.









