Home आणि House दोघांमध्ये फरक काय? 99 टक्के लोकांना सांगताच येणार नाही याचं योग्य उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा आपण म्हणतो, "मी माझ्या नवीन 'हाऊस'मध्ये शिफ्ट झालो" किंवा "चला माझ्या 'होम'ला भेट द्या." पण तांत्रिकदृष्ट्या हे शब्द कुठे आणि कसे वापरावे, यात आपण अनेकदा गल्लत करतो. आजच्या या विशेष लेखात आपण नेमका हाच फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
एका इमारतीला घर बनवण्यासाठी नेमकं काय लागतं? केवळ सिमेंट, विटा आणि वाळूच्या चार भिंती म्हणजे घर का? आपण मराठीमध्ये घराला घरच म्हणतो. पण इंग्रजीत तुम्ही त्याचे वेगवेगळे उच्चार ऐकला असाल. कोणी Home म्हणतं तर कोणी House आपल्याला दोघांचा अर्थ घर हाच माहित आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का ही घरासाठी हे दोन वेगवेगळे शब्द का वापरले गेले आहेत?
advertisement
advertisement
advertisement
1. House (हाऊस): एक भौतिक रचनाHouse हा शब्द प्रामुख्याने एका इमारतीसाठी वापरला जातो. जेव्हा आपण घराच्या बांधकामाबद्दल, रंगाबद्दल किंवा त्याच्या स्ट्रक्चरबद्दल बोलतो, तेव्हा House हा शब्द वापरणे योग्य ठरते.उदाहरण: "बिल्डरने नवीन Houses बांधली आहेत." किंवा "त्या घराचे (House) छप्पर लाल रंगाचे आहे."थोडक्यात सांगायचे तर, जोपर्यंत त्या वास्तूत कोणी राहायला येत नाही आणि तिथे भावना निर्माण होत नाहीत, तोपर्यंत ती केवळ एक इमारत म्हणजेच House असते.
advertisement
2. Home (होम): जिथे मन रमतंHome हा शब्द केवळ भिंतींशी संबंधित नसून तो माणसांशी आणि भावनांशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती जिथे राहते, जिथे तिला सुरक्षित वाटतं आणि जिथे तिचं कुटुंब असतं, त्या जागेला Home म्हटलं जातं. उदाहरण: "मी माझ्या घरी (Home) चाललो आहे." Home हे केवळ एक ठिकाण नसून ती एक सुखद अनुभूती आहे. म्हणूनच म्हणतात ना, "घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती."
advertisement
एक मजेशीर उदाहरणसमजा, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहताय. ती एक इमारत आहे, तिथे सोयीसुविधा आहेत, पण तुम्ही त्याला तुमचं Home म्हणणार नाही, कारण तिथे तुमच्या भावना किंवा तुमचं कुटुंब कायमस्वरूपी नसतं. ते तुमच्यासाठी फक्त एक House किंवा'Building असू शकतं. पण तुम्ही जेव्हा तुमच्या स्वतःच्या घरी परतता, जिथे तुमच्या आई-वडिलांच्या आठवणी आहेत, जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात, तेव्हा ती जागा तुमच्यासाठी Home असते. थोडक्यात सांगायचे तर, House हे विटांनी बनलेलं असतं आणि Home हे प्रेमाने सजलेलं असतं.







