advertisement

राष्ट्रवादीत चौथी विकेट पडणार? सुनेत्राताईंचा दुसरा मोठा आणि चॅलेंजिंग निर्णय, फडणवीसही स्पष्टच म्हणाले...

Last Updated:

Narhari Zirwal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा एक कथित अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

देवेंद्र फडणवीस-सुनेत्रा पवार-नरहरी झिरवाळ
देवेंद्र फडणवीस-सुनेत्रा पवार-नरहरी झिरवाळ
मुंबई : रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी त्यांचाही राजीनामा घेतला जावा, अशी मागणी पुढे येऊ लागलेली आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रूपाली चाकणकर यांच्यानंतर झिरवाळ यांचाही राजीनामा होणार का? राष्ट्रवादीत चौथी विकेट पडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवरून संपर्क करून घटनेविषयी कळवले. तीन चार व्हिडीओ एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केला गेला आहे. चौकशी झाली आहे, असे झिरवाळ यांनी फोन करून म्हटल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सत्यता पडताळून पाहू, अंतिम निर्णय सुनेत्रा वहिनी आणि आम्ही घेऊ

व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात झिरवाळ यांनी तक्रार दाखल करावी, असे मी त्यांना सुचवले आहे. त्या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्यात येतील. शहानिशा करण्यात येईल. पडताळणीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून निर्णय घेऊ, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
advertisement

झिरवाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही

राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिसतो आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागलेली आहे. दुसरीकडे या घटनेसंदर्भात झिरवाळ यांच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीत चौथी विकेट पडणार? सुनेत्राताईंचा दुसरा मोठा आणि चॅलेंजिंग निर्णय, फडणवीसही स्पष्टच म्हणाले...
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement