advertisement

Kairicha Thecha Recipe : चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video

Last Updated:

सध्या मार्केटमध्ये कैरी आलेली आहे. त्यापासून गृहिणी विविध चटपटीत पदार्थ बनवतात. त्यातीलच एक म्हणजे कैरीचा ठेचा. कमीत कमी साहित्यात टेस्टी असा ठेचा तयार होतो. 

+
Summer

Summer Special Recipe 

अमरावती : सध्या मार्केटमध्ये कैरी आलेली आहे. त्यापासून गृहिणी विविध चटपटीत पदार्थ बनवतात. त्यातीलच एक म्हणजे कैरीचा ठेचा. कमीत कमी साहित्यात टेस्टी असा ठेचा तयार होतो. खलबत्त्यामध्ये बारीक केलेला ठेचा आणखीनच टेस्टी लागतो. पारंपरिक पदार्थांची चव ही नेहमी जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे हाताला थोडे कष्ट घेऊन पारंपरिक पदार्थ बनविले जातात. पाहूयात, रेसिपी.
कैरीचा ठेचा बनविण्यासाठी लागणारे साहित्य 
1 बारीक काप करून घेतलेली कैरी, 4 ते 5 हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, जिरे, मीठ, साखर आणि तेल हे साहित्य लागेल.
कैरीचा ठेचा बनविण्याची कृती
सर्वात आधी कढईत तेल टाकून गरम होऊ द्यायचे आहे. नंतर त्यात थोडे जिरे टाकून घ्यायचे आहे. नंतर लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यातच शेंगदाणे देखील टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची आहेत.
advertisement
शेंगदाणे आणि मिरची शिजली की ठेचा बारीक करायला घ्यावा. त्यासाठी मिरची आणि शेंगदाणे बत्त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यातच कोथिंबीर, साखर, मीठ, जिरे, कैरी आणि लसूण टाकून घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे आहे. एकदम पेस्ट सुद्धा करायची नाही. थोडे जाडसर असं वाटून घ्यायचे आहे.
ठेचा बारीक करून घेतला की, खाण्यासाठी तयार होतो. चटपटीत असा कैरीचा ठेचा तुम्ही पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kairicha Thecha Recipe : चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement