आधी प्रार्थना बेहेरे, आता या अभिनेत्रीची सासू बनणार निर्मिती सावंत! या दिवशी येतोय नवीन चित्रपट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
सासू-सुनेच्या नात्याभोवती फिरणाऱ्या कथा मराठी प्रेक्षकांना नेहमीच भावतात. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे त्यांची सून होती. सासू-सुनेच्या या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुन्हा एकदा अभिनेत्री निर्मिती सावंत नव्या सिनेमातून सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'कप बशी' हा आगामी मराठी चित्रपट 5 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केलं आहे.
advertisement
या सिनेमात निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबत अभिनेत्री पूजा सावंत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रार्थना बेहेरेनंतर पूजा सावंत आणि निर्मिती सावंत या सासू-सुनेची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
advertisement

'कप बशी' या चित्रपटाची कथा एका सासू-सुनेच्या नात्याभोवती फिरते. अरुण आणि अरुणा हे दांपत्य आपल्या मुलासाठी सून शोधत असतात. मात्र अरुणा यांच्या अध्यात्मिक गुरूंनी सूनेबाबत काही खास अटी घातलेल्या असतात. त्या अटी पूर्ण करणारी मुलगी त्यांना सापडते का? आणि या अटींमुळे लग्न जुळतं की नाही? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटातून मिळणार आहेत.
advertisement
आधुनिक काळातही पत्रिका आणि परंपरांना महत्त्व दिलं जातं यावरही या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे. विनोदी आणि हलक्या-फुलक्या अंदाजात मांडलेली ही कथा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.
प्रार्थना बेहरेनंतर आता पूजा सावंतसोबत सासू-सुनेची केमिस्ट्री रंगवताना निर्मिती सावंत कशा दिसतात हे पाहणं इंटेरेस्ट्रिंग ठरणार आहे. पण त्यासाठी प्रेक्षकांना 5 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 3:32 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी प्रार्थना बेहेरे, आता या अभिनेत्रीची सासू बनणार निर्मिती सावंत! या दिवशी येतोय नवीन चित्रपट










