यंदा मान्सूनवर अल निनोचं सावट; कधी येणार मान्सून कसा राहणार पाऊस? स्कायमेटचा पहिला अंदाज
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात पावसाची स्थिती कदाचित सामान्य वाटेल. मात्र, खरा खेळ जुलै आणि ऑगस्टमध्ये सुरू होईल. याच काळात अल निनोचा प्रभाव सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज आहे.
उन्हाचा चटका वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाची एन्ट्री झाली आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तापमान 40 डिग्री आणि दुसरीकडे गारपिटीचा पाऊस यामुळे लोक हैराण झाले आहेत. मार्च एन्डलाच ही गत तर मे महिना कसा सरायचा उकाड्याने या विचारानेच बैचैन व्हायला झालं आहे. प्रशांत महासागरात अल निनो इतके दिवसांपासून शांत होता मात्र आता पुन्हा अॅक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील हवामानावर होणार आहे. स्कायमेटने अल निनोचा परिणाम मान्सूनवर होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
यावेळी पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. अल निनो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाचं बिघडलेलं चक्र. जेव्हा प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान प्रमाणाबाहेर वाढते, तेव्हा तिथून वाहणारे गरम वारे मान्सूनच्या ढगांना रोखतात किंवा त्यांची दिशा बदलतात. यंदा हे तापमान २.५ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जर असं झालं, तर त्याला हवामान तज्ज्ञ सुपर अल निनो' किंवा मॉन्स्टर अल निनो म्हणतात.
advertisement
कधी बसणार पावसाला फटका?
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात पावसाची स्थिती कदाचित सामान्य वाटेल. मात्र, खरा खेळ जुलै आणि ऑगस्टमध्ये सुरू होईल. याच काळात अल निनोचा प्रभाव सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. जुलै महिना हा शेतीतील पेरण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, पण नेमक्या याच वेळी पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं. स्कायमेटने आपल्या अहवालात आधीच स्पष्ट केलंय की, यंदाचा पाऊस अपेक्षेपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे.
advertisement
बळीराजाची चिंता आणि सरकारी नियोजन
हवामान विभागाचा (IMD) अधिकृत आणि सविस्तर अंदाज एप्रिलच्या मध्यावर येणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, पिकांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पाऊस कमी उष्णता जास्त राहण्याचा धोका आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 15 एप्रिलनंतर हवामान विभागाचा अंदाज नेमका काय येतो याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 3:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यंदा मान्सूनवर अल निनोचं सावट; कधी येणार मान्सून कसा राहणार पाऊस? स्कायमेटचा पहिला अंदाज










