Marathi Serial : एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण! नव्या मराठी मालिकेची सुरुवातच धक्कादायक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial : नव्याने सुरू होणाऱ्या मालिकेची सुरुवातच धक्कादायक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
advertisement
दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे. एक कुटुंब ज्यात पैसा कमी असला तरी आनंदी भावंडं दाखवण्यात आली आहे. तर दुसरं कुटुंबं घरंदाज दाखवण्यात आलं आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरुवातीलाच भयंकर घटना घडल्याचं दाखवण्यात आलं आहे. ज्यामुळे एका बहिणीच्या काळजात सुडाची ज्वाला धगधगते तर दुसरीच्या मनात प्रेमाची ज्योती आणि दुसरीकडे दारूच्या नशेत बुडालेला दीप.
advertisement
एकिकडे एक मध्यमवर्गीय पण आनंदी ज्योतीचं कुटुंब. ज्योती मालिकेतील मुख्य नायिकेचं नाव. तिचे वडील दारू प्यायचे. दारूच्या नशेत त्यांनी स्वत:च्या आयुष्याची वाट लावली. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीतवर येऊन पडते. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे. या कुटुंबात पैसा फार नसतो पण तरी घरात आनंदाचं वातावरण आहे.
advertisement
दुसरीकडे एक घरंदाज कुटुंब. ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम. त्यांची तीन मुलं स्वराज , दीप , विराज. आणि सोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीप ज्याला त्याचे वडील त्याच्या आईच्या मृत्यूसाठी जबाबदार धरतात आणि त्याचा तिरस्कार करतात.
advertisement
मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे ह्यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचं लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी ह्यांनी तर संवाद लेखन इरफान मुजावर यांनी केलंय. मालिकेचं दिग्दर्शक अमित सावर्डेकर आहेत.
advertisement
advertisement






