advertisement

सव्वा वर्ष मी शांत होतो, बोलायला लागलो तर.... धनजंय मुंडेंचा विरोधकांना थेट इशारा

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा पट उलगडत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. 

News18
News18
मुंबई :   माझा जन्म झाला, तेव्हापासूनच माझ्या नशिबात संघर्षाचे चक्र सुरू झाले. जन्मानंतर चार महिने माझे डोळे उघडले नव्हते, लिव्हरचा जन्मजात त्रास होता. मी कसा वाचलो, हे त्या देवाच ठाऊक! मात्र, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्यावर आजवर अनेक संकटे आली, पण वाईट वेळ कधीच आली नाही, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास कार्यकर्त्यांसमोर मांडला. भायाळा येथे आयोजित नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मुंडे एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले.
गेल्या सव्वा वर्षातील राजकीय घडामोडींवर भाष्य धनंजय मुंडेंनी केले आहे. माझ्यावर अनेक आघात झाले, अनेकांनी टीका केली. पण मी सव्वा वर्ष शांत राहिलो. जर माझ्या गप्प राहण्यामध्ये एवढी मोठी ताकद असेल, तर मी बोलायला लागल्यावर काय होईल, याचा विचार करा... विरोधकांच्या टीकेला त्यांनी टोला लगावला. यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या समर्थकांच्या डोळ्यांत मुंडेंवर झालेल्या अन्यायाचा राग आणि ते पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याचा आनंद, अशा दोन्ही भावना दिसत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
advertisement

रथात का बसलो नाही? धनंजय मुंडेंनी उलगडलं गुपित

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी मुंडे यांना रथावर बसवण्याचा मोठा आग्रह धरला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. त्यामागचे गुपित सांगताना ते म्हणाले, "रथावर बसायचे असेल तर घोड्याच्या रथावर बसावे लागते, मोराच्या नाही. माझे नाव 'धनंजय' आहे, जे अर्जुनाच्या नावांपैकी एक आहे. त्यामुळे कुठल्या रथावर आणि कधी बसायचे, हे मला चांगले ठाऊक आहे. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
advertisement

बीडच्या राजकारणात नवी चर्चा

बीडमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा पट उलगडत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.  त्यांच्या राजकीय फटकेबाजीने बीडच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सव्वा वर्ष मी शांत होतो, बोलायला लागलो तर.... धनजंय मुंडेंचा विरोधकांना थेट इशारा
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement