माझी पालखी मोठी... एकवीरा देवीच्या यात्रेत तुफान राडा, दोन गट का भिडले? कारण आलं समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
यात्रेला गालबोट लागलं असून दोन गटांमध्ये झालेला वाद दगडफेकीपर्यंत पोहचला. मात्र ही दगडफेक कशामुळे करण्यात आली आहे कारणे समोर येत आहेत.
गणेश दुडम, प्रतिनिधी
पुणे: लोणावळ्यातील आई एकवीरा देवीच्या गडावर आग्री कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकवीरा देवीची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र यात्रा संपत असताना या यात्रेला गालबोट लागलं असून दोन गटांमध्ये झालेला वाद दगडफेकीपर्यंत पोहचला. मात्र ही दगडफेक कशामुळे करण्यात आली आहे कारणे समोर येत आहेत.
आदल्या दिवशी दगडफेक झाली असताना पुन्हा दुसऱ्या दिवशी हा वाद उफाळून आला. माझी पालखी मोठी की तुझी पालखी मोठी? या वादन पुन्हा उग्ररूप धारण केलं. पुन्हा दगडफेक आणि काही उलटबाज भाविकांनी परिसरातील गवताला आग लावण्याचे प्रकारही केले. दरम्यान या वादाचं कारण सांगत देवस्थानचा या घटनेची कुठलाही संबंध नसल्याचं एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी स्पष्ट केले त्यांनी दोन्ही गटाचे भेट घेत समज दिल्याचे सुद्धा म्हटले भविष्यात अशा घटनांचे पुनरावृत्ती होणार नाही याबाबत कठोर निर्णय घेणार आहे.
advertisement
दगडफेक करणाऱ्या भाविकांच्या विरोधात गुन्हे दाखल
तर या घटनेबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी परस्परविरोधी दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही आणि अन्य प्रत्यक्षदर्शींची बोलत दगडफेक करणाऱ्या भाविकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
सोशल मीडियावरती प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाला वाद
घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच आई एकवीरा देवी देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थांनी बैठक घेतली. या घटनेचा आढावा घेतला आणि भविष्यात असा प्रकार होणार नाही याबाबत काही उपाययोजना करण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय, मात्र असं असलं तरी सोशल मीडियावरती प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झालेल्या वादाच रुपांतर दगडफेकीत झाला आणि याचा मोठा फटका भाविकांना देखील बसला आहे. त्यामुळे भविष्यात भाविकांनी आई एकविरा देवीच्या केवळ दर्शनासाठीच येण्याचं आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 3:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
माझी पालखी मोठी... एकवीरा देवीच्या यात्रेत तुफान राडा, दोन गट का भिडले? कारण आलं समोर










