advertisement

Skin Care : महागड्या स्किन केअरची गरज नाही, पण या 4 गोष्टी चेहऱ्यावर लावल्याच पाहिजे! तज्ञांनीच सांगितलं

Last Updated:

Minimal skin care : आपली त्वचा निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी फार काही नाही, फक्त 4 अशा गोष्टी आहेत ज्या लावायलाच हव्या. असं डॉ. पल्लवी अहिरे शेळके यांनी सांगितलं.

चेहऱ्यावर या ४ गोष्टी नक्की लावा
चेहऱ्यावर या ४ गोष्टी नक्की लावा
मुंबई : स्किन केअरचं महत्त्व आता लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. जवळपास सर्वजण आता आपल्या त्वचेची, चेहऱ्याची काळजी घेतातच. पण काही बऱ्याचदा स्किन केअर करायचं म्हणजे महागड्या आणि खूप गोष्टी चेहऱ्यावर सारख्या लावायच्या असं नाही. आपल्या चेहऱ्याचा मोजक्या पण काही खास गोष्टींची गरज असते.
आपली त्वचा निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी फार काही नाही, फक्त 4 अशा गोष्टी आहेत ज्या लावायलाच हव्या. याबद्दल डॉ. पल्लवी अहिरे शेळके यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे.
चेहऱ्यावर या 4 गोष्टी नक्की लावा..
1. जेंटल क्लींजर : तुमच्या चेहऱ्यावरचा बॅरियर प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्ही जेंटल क्लींजर चेहऱ्यावर वापरायला हवं. जो क्लींजर तुमच्या त्वचेचं पीएच चेंज करत असेल, त्वचेचं मॉइश्चर खेचून घेत असेल किंवा त्यामुळे त्वचेवर ओरखडे येत असतील तर ते वापरणं टाळा. याने तुमचं स्किन केअर चांगलं होऊच शकत नाही. म्हणून जेंटल क्लींजरच वापरा.
advertisement
2. मॉइश्चरायझेशन : त्वचेला मॉइश्चरायझर लावणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण बाहेर जातो, तेव्हा बाहेरच्या वातावरणामध्ये आपल्या त्वचेचा ट्रांसीपीडर्नल वॉटर लॉस होतो. म्हणजेच त्वचेतून पाणी निघून जातं. अशावेळी एखादा चांगलं मॉइश्चरायझर लावणं खूप आवश्यक असतं. याने तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. मॉइश्चरायझर निवडताना ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडा.
3. सनस्क्रीन : त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं, ते म्हणजे सनस्क्रीन. बाकीच्या सर्व गोष्टींप्रमाणे सनस्क्रीनही तुमच्या त्वचेसाठी खूप आवश्यक आहे. सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्याला जास्तीचं प्रोटेक्शन मिळतं, जे फक्त उन्हाळ्यातच नाही तर सर्व ऋतूंमध्ये आपल्यासाठी खूप गरजेचं असतं.
advertisement
4. कोणताही सिरम किंवा क्रिम : यानंतर जर तुम्हाला वाटतं असेल की, मी लग्झरी म्हणून माझ्या स्किनवर काही लावायला हवं, तर रात्रीच्या वेळी आपण स्किनला रिपेअर करण्यासाठी काही लावू शकतो. त्वचा रिपेअर करण्यासाठीही परत तिचं गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे प्रोटेक्ट, दुसरं नरीशमेंट म्हणजे पोषण देणं आणि तिसरं रिपेअर.
- त्वचेला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण सेरामाइड्स वापरू शकतो. सेरामाइड्स त्वचेच्या अगदी आतमध्ये जाऊन त्वचेची आर्द्रता म्हणजेच ओलावा टिकवून ठेवतात.
advertisement
- दुसरं आपल्या त्वचेला नरीशमेंट हवी असते. त्यासाठी काही व्हिटॅमिन्स आणि एंटीऑक्सिडंट्स असतात, जे आपण त्वचेवर वापरू शकतो.
- त्वचा स्वतःच स्वतःला रिपेअर करत असते. त्याला फक्त आपण सपोर्ट म्हणून काही गोष्टी द्यायला पाहिजे. जसं की, थोडंसं रेटिनॉल, थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, कोपर पेप्टाइड्सचाही तुम्ही वापर करू शकता.
advertisement
तुमची त्वचा निरोगी आणि सदैव चमकदार ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त या 4 गीष्टी रोज चेहऱ्यावर लावण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त तुम्ही काहीही नाही केलंत तरी तुमची त्वचा चांगली राहते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : महागड्या स्किन केअरची गरज नाही, पण या 4 गोष्टी चेहऱ्यावर लावल्याच पाहिजे! तज्ञांनीच सांगितलं
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement