जेवण बनवण्याची ऑर्डर पूर्ण करायला निघाले, वाटेत ट्रकची भीषण धडक, सोलापुरात 2 मित्रांचा जागीच मृत्यू
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
भरधाव ट्रकने दिलेल्या धडक इतकी भीषण होती की, संसाराचा गाडा ओढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन जिवाभावाच्या मित्रांचा जागीच अंत झाला.
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचा प्रत्यय आज सोलापूरकरांना पुन्हा एकदा आला. शुक्रवारची सकाळ बोरामणी नाका परिसरासाठी काळ बनून आली. भरधाव ट्रकने दिलेल्या धडक इतकी भीषण होती की, संसाराचा गाडा ओढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन जिवाभावाच्या मित्रांचा जागीच अंत झाला.
बोरामणी ता. दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असलेले सैफन शेखफरीद पटेल वय 40 आणि हुजूर अलाउद्दीन पटेल वय 36 हे दोघे पेशाने भटारी (स्वयंपाक करण्याचे काम) होते. कुणाच्या तरी घरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, जेवण बनवण्याची ऑर्डर पूर्ण करायला ते दोघे दुचाकीवरून सोलापूर शहराकडे येत होते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बोरामणी नाका येथे एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तत्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच रुग्णालयात एकच हंबरडा फोडण्यात आला. दोन्ही मृतांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय असून, घरातील कमावत्या व्यक्ती गेल्याने या कुटुंबांचा आधारच हरपला आहे.
सोलापूरमधील घटना, भरधाव ट्रकने दिली धडक, दुचाकीस्वारांचा मृत्यू pic.twitter.com/N6m3idAJLr
— VIRALबाबा (@viralmedia70) March 27, 2026
advertisement
दिवसभर लोकांची भूक शमवण्यासाठी कष्ट करणाऱ्या या दोन हातांचा असा रक्ताच्या थारोळ्यात अंत झालेला पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. जेलरोड पोलिसांनी या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरु आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 4:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
जेवण बनवण्याची ऑर्डर पूर्ण करायला निघाले, वाटेत ट्रकची भीषण धडक, सोलापुरात 2 मित्रांचा जागीच मृत्यू








