advertisement

बापाला मिल्कशेकमधून Poison देणारी विषकन्या आहेत तरी कोण? तीन वर्षांनी खरा चेहरा समोर

Last Updated:
वडिलांसाठी विष आर्याने तिच्या मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून पाच हजार रुपयांना घेतल्याची माहिती आहे
1/9
चंद्रपूरमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून स्वतःच्या मुलीने विष देऊन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा खुलासा तब्बल तीन वर्षांनंतर झाला आहे.

2/9
मयत पोलीस कर्मचारी जयंत बाल्लावार यांचा 25 एप्रिल 2023 रोजी ड्युटीवर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं.

3/9
 मात्र, तीन दिवसांपूर्वी मृतकाचा जावई आशिष शेडमाके याने पोलिसांकडे कबुली देत संपूर्ण प्रकरण उघड केलं. त्यानंतर या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

4/9
जावयाने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आणि मृतकाची मुलगी आर्या बाल्लावार हिने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष देऊन हत्या केली. वडिलांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे हा कट रचण्यात आला होता.

5/9
वडिलांसाठी विष आर्याने तिच्या मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून पाच हजार रुपयांना घेतल्याची माहिती आहे.

6/9
वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिष यांनी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये वाद वाढले.

7/9
दरम्यान, बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाके याला पोलीस ट्रेनिंगदरम्यान सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.

8/9
 तसेच आर्या सासरी न जाता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिषनेच अखेर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर उघड केलं.

9/9
या प्रकरणात रामनगर पोलिसांनी महिला पोलीस कर्मचारी आर्या बाल्लावार, आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष पुरवणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?
नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?
View All
advertisement