20 भाषांमध्ये 60 सिनेमे 40 मालिका... सैफ अली खानची GF होती 90s ची स्टार हिरोईन, इंडस्ट्री सोडून आता करतेय 'हे' काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Guess Who: या अभिनेत्रीने हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू अशा तब्बल २० भाषांमध्ये ६० हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्याशिवाय ४० टीव्ही सीरियल्समधून त्यांनी घराघरात ओळख निर्माण केली.
advertisement
advertisement
दिग्गज अभिनेत्री सुचित्रा सेन यांची मुलगी असलेल्या मुनमुन सेन यांनी आपल्या आईचं नाव पुढे नेलंच, पण त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू अशा तब्बल २० भाषांमध्ये ६० हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्याशिवाय ४० टीव्ही सीरियल्समधून त्यांनी घराघरात ओळख निर्माण केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुनमुन सेन यांच्या सासूबाई इला देवी या कूचबिहारच्या राजकुमारी होत्या, तर जयपूरची महाराणी गायत्री देवी यांच्याशीही त्यांचं रक्ताचं नातं आहे. या रॉयल फॅमिली बॅकग्राऊंडमुळे मुनमुन सेन यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा जाणवतो. आज त्यांच्या दोन्ही मुली रायमा सेन आणि रिया सेन देखील इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
advertisement
आज जरी मुनमुन सेन रुपेरी पडद्यापासून दूर असल्या, तरी त्यांचं आयुष्य तितकंच रंजक आहे. त्यांनी जादवपुर युनिव्हर्सिटीमधून लिटरेचरमध्ये मास्टर्स केलं आहे. त्यांना पेंटिंग आणि जुन्या अँटीक वस्तू जमा करण्याची प्रचंड आवड आहे. इकतंच नाही, तर त्या सध्या एका बंगाली कुकबुकवर काम करत असून लवकरच ते प्रकाशित होणार आहे.







